शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दशावतारी कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार, आमदार नीलेश राणेंच्या आग्रहानंतर सांस्कृतिक मंत्रालयाची दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 17:25 IST

जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत होते

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांच्या प्रश्नावर सोमवारी मुंबई येथे संस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या  बैठकीत जिल्ह्यातील दशावतारी कलेला राजाश्रय मिळण्याबरोबरच कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आग्रहाची भूमिका   आमदार नीलेश राणे यांनी  केली.या मागण्यांबाबत सांस्कृतिक मंत्रालयाने  दखल घेऊन कलाकारांची जिल्हास्तरावर नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा पायलेट प्रोजेक्ट सिंधुदुर्गपासून सुरुवात करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या. त्यामुळे येणाऱ्या काळात दशावतारी कलेबरोबरच कलाकारांनादेखील राजाश्रय मिळण्याचा राजमार्ग अखेर खुला झाला आहे.जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत होते. परंतु, या मागण्यांना  यश आले नव्हते. यावर या कलाकारांनी आमदार  राणे यांच्याकडे  व्यथा मांडल्या होत्या. त्यानुसार आमदार राणे यांनी सोमवारी आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकाराने राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे दशावतारी कलाकारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विशेष बैठक झाली.यावेळी सिंधुदुर्ग आणि मुंबईतील सुमारे दोन हजारांहून अधिक दशावतारी कलाकारांची शासन दरबारी अधिकृत नोंद व्हावी, त्याचप्रमाणे या कलाकारांसाठी देण्यात येणारी शासनाची मदत थेट कलाकारांच्या खात्यात जमा व्हावी, सांस्कृतिक मंत्रालयाच्या शिफारस समितीवर कलाकारांना समाविष्ट करून घ्यावे, वृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या मानधनामध्ये  दशावतारी कलाकारांचा अधिकचा वाटा मिळावा, यासाठी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी केली.सांस्कृतिक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या राज्यस्तरीय समितीमध्ये चार दशावतारी कलाकार व सदस्य यांची नेमणूक करण्याच्या सूचना  मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या. या बैठकीसाठी दत्तमाऊली संस्था सचिव दत्तप्रसाद शेणई, पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ अध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर, कला दिग्दर्शक रूपेश नेवगी, दशावतार हितवर्धक नाट्य संस्था मुंबई अध्यक्ष आशिष गावडे, राजाराम धुरी, श्री देव बुटेश्वर दशावतार नाट्य मंडळ मुंबई सल्लागार विश्राम धुरी, दादा साईल, देवेंद्र सामंत, आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNilesh Raneनिलेश राणे Ashish Shelarआशीष शेलार