दापोली : शालेय विद्यार्थ्यांकडे अश्लिल क्लिप्स

By Admin | Updated: September 20, 2014 00:21 IST2014-09-19T23:16:58+5:302014-09-20T00:21:39+5:30

याप्रकरणी हायस्कूल प्रशासनाने तब्बल १४ मुलांना निलंबित केले आहे. त्यातील ३ विद्यार्थ्यांना शाळेतून आपला दाखला काढून दिल्याचीही चर्चा

Dapoli: Ashlyn clips to school students | दापोली : शालेय विद्यार्थ्यांकडे अश्लिल क्लिप्स

दापोली : शालेय विद्यार्थ्यांकडे अश्लिल क्लिप्स

दापोली : दापोलीतील एका हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांकडे अश्लिल व्हिडिओ क्लिप्स सापडल्या असून या क्लिप्स याच शाळेतील मुलींच्या असल्याची चर्चा दापोलीत ऐकायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर इयत्ता ९वीतील मुले अंमली पदार्थ वापरतानाही काहींनी पकडले असून याप्रकरणी हायस्कूल प्रशासनाने तब्बल १४ मुलांना निलंबित केले आहे. त्यातील ३ विद्यार्थ्यांना शाळेतून आपला दाखला काढून दिल्याचीही चर्चा जोरात आहे.
याबाबत दापोलीतील ऐकू येत असलेली चर्चा अशी की, शहरातील एका प्रतिष्ठीत हायस्कूलमध्ये नेहमीप्रमाणे राष्ट्रगीत चालू असताना शहरातील एका प्रतिष्ठीत बांधकाम व्यावसायिकाच्या ९वीत शिकणाऱ्या मुलाचा मोबाईल खणखणला. हायस्कूलमध्ये मोबाईल वापरावरच बंदी असताना या विद्यार्थ्याने हा सुमारे ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणला कसा? याबाबत अधिक चौकशी करता या मोबाईलमध्ये काही अश्लिल व्हिडीओ क्लिप असल्याचे निदर्शनास आले. मात्र वर्गशिक्षकांनी सखोल चौकशी केली असता या साऱ्या प्रकरणात शाळेतील तब्बल १४ विद्यार्थी-विद्यार्थीनी सामील असल्याची चर्चा ऐकावयास मिळाली.
याच ग्रुपमधील काही मुलांना आझाद मैदानात असणाऱ्या इमारतीमध्ये शालेय विद्यार्थी अंमली पदार्थांचे सेवन करत असतानाच काहींनी पकडले. त्यामुळे या विषयाची चर्चा दापोली शहरासह तालुक्यातही ऐकावयास मिळाली. या साऱ्या प्रकरणाची मग हायस्कूलच्या प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली. आठ दिवसांपूर्वी ९ वी व ११ वीतील तब्बल १४ मुलांना हायस्कूलमधून निलंबित करण्यात आले व त्यांच्या पालकांना याची कल्पना देण्यात आली. मात्र दोनच दिवसापूर्वी बंद खोलीमध्ये झालेल्या बैठकीत पालक व शाळा प्रशासनामध्ये वादावादी होऊन १४ पैकी ३ विद्यार्थ्यांना शाळेतूनच काढून टाकण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. (प्रतिनिधी)

१४ मुलांना केले निलंबित.
तिघा विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्याचीही चर्चा.
आणखी एका ‘क्लिप्स’प्रकरणाने दापोली हादरले.
नववीतील मुले अंमली पदार्थ वापरतानाही पकडल्याची चर्चा.

Web Title: Dapoli: Ashlyn clips to school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.