गरोदर मातांना घडतोय धोकादायक प्रवास ...
By Admin | Updated: May 3, 2014 17:05 IST2014-05-03T13:23:35+5:302014-05-03T17:05:54+5:30
शासनाने सुरू केलेली जननी सुरक्षा योजना चांगली असली तरी त्याचा ताण सीपीआरमधील प्रसूती विभागावर पडत आहे. प्रत्येक तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांवर उपचार करण्यास चालढकल केली जात आहे.

गरोदर मातांना घडतोय धोकादायक प्रवास ...
बाजीराव जठार (वाघापूर) : शासनाने सुरू केलेली जननी सुरक्षा योजना चांगली असली तरी त्याचा ताण सीपीआरमधील प्रसूती विभागावर पडत आहे. प्रत्येक तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांवर उपचार करण्यास चालढकल केली जात आहे. गर्भवती महिलांना रुग्णवाहिकेतून दूर अंतरावरून आणताना त्यांचा प्रवासही धोकादायक बनत असल्याचे वास्तव पुढे येत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून बहुतांशी गर्भवती महिलांना सीपीआरमध्ये पाठविले जाते. त्यामुळे सीपीआरमध्ये रुग्णांना सुविधा देताना कसरत करावी लागत आहे.
जिल्ातील ग्रामीण भागात ११० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत तसेच ६ ग्रामीण रुग्णालये आहेत. आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील गर्भवती महिला प्रसूतीसाठी येतात. अनेकवेळा येथे महिलांची किरकोळ तपासणी करून थेट सीपीआरकडे पाठवून दिले जाते. त्यासाठी १०८ या दूरध्वनी क्रमांकावर मिळणारी जननी सुरक्षा अभियानातील रुग्णवाहिका बोलावून घेतली जाते व त्या गाडीतून सीपीआरकडे पाठविले जाते, अशा गर्भवतींना घेऊन भरधाव वेगाने वाहतुकीचे अडथळे चुकवत सीपीआरच्या दिशेने येतात. दिवसाला किमान १५ ते २० गर्भवती सीपीआरमध्ये दाखल होतात. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात.
सीपीआरमध्ये प्रसूती विभागात ६५ बेड आहेत. त्यातील प्रसूतीसाठी किमान ४० बेड वापरले जातात व इतर उपचारासाठी दाखल केलेल्या महिलांसाठी उर्वरित बेड वापरले जातात. येथे उपचार घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या बेडच्या संख्येपेक्षा जास्त महिला दाखल होतात. त्यामुळे या विभागाला अक्षरश: कसरत करून येथे सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. यामुळे गर्भवती महिलांचा प्रवास धोकादायक होतो. सीपीआरमध्ये कमी बेडची संख्या असल्याने गर्दी होते. काहीवेळेला फरशीवरच झोपावे लागते. त्याचा बाळंतिणीला त्रास होतो.
सीपीआरमध्ये बाळंतिणींना दाखल करण्यासाठी शाहूवाडी, गगनबावडा, शिरोळ, गारगोटी, चंदगड अशा तालुक्यातील गावांतून रुग्णवाहिका सीपीआरपर्यंत आणल्या जातात. रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढती आहे. ते अडथळे दूर करत येथे महिलांना आणले जाते. या सार्यातून रुग्णवाहिकांची सोय चांगली असली तरीही रस्त्यावरील प्रवासाचा धोका मात्र वाढतो आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातून सीपीआरमध्ये महिलांना पाठविण्याची वृत्ती ही गैरसोय व धोका वाढविणारी आहे. त्यामुळे या सुविधेला दिशा देण्याची गरज आहे.
बातमी जोड देत आहे.