‘डेंजर’ कशेडीतून वाहतूक सुरुच

By Admin | Updated: July 9, 2015 23:48 IST2015-07-09T23:48:45+5:302015-07-09T23:48:45+5:30

सुरक्षेकडे दुर्लक्ष : बांधकाम खात्याची बेपर्वाई

'Danger' transport from the cushions | ‘डेंजर’ कशेडीतून वाहतूक सुरुच

‘डेंजर’ कशेडीतून वाहतूक सुरुच

खेड : वारंवार कोसळणाऱ्या दरडी, खचणारा रस्ता यामुळे कशेडी घाटाचा यंदाही डेंजर झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. वाढणारी वाहतूक लक्षात घेता बांधकाम खात्याने यावर्षीही या मार्गावर सुरक्षेची कोणतीही काळजी घेतलेली नाही. सलग दोन वर्षे याच घाटात अजस्त्र दरड कोसळून संपूर्ण वाहतूक काही दिवस बंद झाली होती.
घाटाला पर्याय म्हणून नातूनगरमार्गे तुळशीमधून असलेल्या मार्गाचे मजबूतीकरण करणे आवश्यक आहे. हा मार्ग बंद पडला, तर कशेडी घाटासाठी महाड - शिरगाव येथून तुळशी खिंडमार्गे नातूनगर हा पर्यायी मार्ग आहे. मात्र, हा राज्यमार्ग असल्याने कशेडी घाटात वाहतूक ठप्प झाल्यानंतर वाढणाऱ्या पर्यायी वाहतुकीचा बोजा सहन करण्यासाठी त्याचे मजबूतीकरण करणे आवश्यक आहे. या घाटमाथ्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. मात्र, वाढणारी वाहनांची संख्या, अवजड वाहतूक व निसर्गाचा कहर यामुळे हा घाट अतिधोकादायक झाला आहे. गतवर्षी रायगड जिल्ह्यातील भोगावच्या हद्दीत काही वर्षांपासून कोसळणाऱ्या दरडींमुळे १५० मीटर अंतराचा रस्ता खचला होता. जुलै २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीत धामणदिवी व भोगावच्या हद्दीत कोसळलेल्या दरडींमुळे हा मार्ग १२ दिवस बंद होता. २०११ मध्ये ऐन गणेशोेत्सवात ३ आणि ४ आॅगस्टला खेड तालुक्यातील काळकाई मंदिरापासून जवळच तीन वेळा मोठ्या दरडी कोसळून हा मार्ग बंद झाला होता.
महाड मार्ग बांधकाम विभागाकडून भोगावच्या हद्दीत खचणारा रस्ता दरवर्षी दुरूस्त करण्यात येतो. घाटातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस चौकी असली तरी या शाखेकडे पोलीस दल अपुरे आहे. अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यावरून बाजुला करण्यासाठी क्रेन आहे. त्यामुळे पोलिसांना मदतकार्यात, आपत्ती काळात अडचणी निर्माण होतात. महाड - शिरगाव येथून तुळशी खिंडमार्गे नातूनगर हा पर्यायी मार्ग आहे. मात्र, हा राज्यमार्ग असल्याने कशेडी घाटात वाहतूक ठप्प झाल्यानंतर पर्यायी वाहतुकीचा बोजा सहन करण्यासाठी त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे.(प्रतिनिधी)

महामार्गावरील महत्त्वाचा घाट म्हणून कशेडी घाटाची ओळख आहे. या घाटात दरडी कोसळल्याने वेळोवेळी वाहतूक ठप्प होते. महाडच्या हद्दीतल भोगाव रस्ता दुरूस्त करण्यात येतो. मात्र, यंदा रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील कशेडी घाटातील दरडीचा प्रश्न तसाच आहे.

Web Title: 'Danger' transport from the cushions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.