शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

नडगिवे घाटात दरडींचा धोका कायम, खारेपाटणमध्ये संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:37 IST

कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरील नडगिवे घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळायला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देनडगिवे घाटात दरडींचा धोका कायम, खारेपाटणमध्ये संततधार मुंबई-गोवा महामार्गाचा सर्व्हिस रस्ता खचल्याने भीती

खारेपाटण : कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खारेपाटण परिसराला चांगलेच झोडपून काढले. काही ठिकाणी दरडी कोसळल्याने नुकसान झाले आहे. विशेष करून मुंबई-गोवा महामार्गाला याचा जास्त फटका बसला आहे.

महामार्गावरील नडगिवे घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळायला सुरुवात झाली आहे. दिवसभर महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने जेसीबी मशीनच्या सहाय्याने महामार्गावर कोसळलेली दरडीची माती, दगड हटविण्याचे काम जोरदार सुरू होते. तर महामार्गावर पाण्याचे पाट वाहताना दिसत होते.खारेपाटण पंचशीलनगर येथील संतोष पाटणकर यांच्या घरच्या मागील बाजूला दरड कोसळली असून याला लागून असलेली संरक्षक भिंत तुटून चिरे माती सर्वत्र पसरली आहे. या दरडीमुळे पाटणकर यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. तर त्यांच्या शेजारी घर असलेले संतोष तुरळकर यांची संरक्षक भिंत तुटून दरड कोसळल्यामुळे त्यांच्या देखील शौचालयाच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे.सदरची घटना समजताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत व खारेपाटण तलाठी रमाकांत डगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन कोसळलेल्या दरडीची पाहणी केली. खारेपाटण बॉक्सवेल समोरील विजय पराडकर यांच्या घरासमोरील दरड कोसळल्याने त्यांच्या घरासह सर्वच पराडकर बंधूंच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.

खारेपाटण वरचे बसस्थानक येथील मुख्य मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेला रस्ता काही प्रमाणात खचला असून यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मुळात इथे टाकण्यात आलेला मातीचा भराव योग्य पद्धतीने भरला गेला नसल्यामुळे तसेच जमिनीपासून या भरावाची मोठी उंची ठेवण्यात आली आहे. तसेच या रस्त्याला बांधण्यात आलेली संरक्षक भिंत अशी रस्ता खचण्याची अनेक कारणे असू शकतात. महामार्ग प्राधिकरणाकडून याची पुन्हा तपासणी करून घेणे गरजेचे आहे.कार्यालयात पाणीखारेपाटण येथील मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याला गटार नसल्याने पडलेल्या मुसळधार पावसाने पाणी चक्क खारेपाटण येथील महामार्गाला लागून असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात गेले. तर यालाच लागून असलेल्या महामार्गावरील प्रभाकर पोमेडकर यांच्या मोबाइलच्या दुकानासह अन्य दुकानदारांच्या देखील दुकान गाळ्यात या पावसाचे पाणी गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग