शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान, तातडीने भरपाई द्या; देवगडमध्ये भाजपची निवेदनद्वारे मागणी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 10, 2024 17:04 IST

देवगड ( सिंधुदुर्ग ) : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे ...

देवगड (सिंधुदुर्ग) : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आरीफ बगदादी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देत भाजपाने केली आहे.देवगडचे तहसीलदार खत्री यांची आज भेट देऊन हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देवगड तालुक्यामध्ये दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडून आंबा कलमावरील मोहोर व आंबा फळांचे नुकसान झाले आहे.आंबा उत्पादन समाधान कारक व्हावे या हेतूने खते, किटकनाशके, मेहनत मजूरी, यावर लाखो रुपये खर्च करून अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. आधीच कर्जबाजारी असलेले आंबा बागायतदार, हाता तोंडाशी आलेले आंबा पिक वाया जात असलेले पाहून हताश झाले आहेत.तरी सदर घटनेचे गांर्भीय विचारात घेवून संबंधित नुकसानी बाबत तातडीने पंचनामे करुन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाला सूचित करावे. तसेच पिक विमा रक्कमेचा पूर्ण परतावादेखील तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी संबंधित विमा कंपन्यांना सूचना कराव्यात अशी विनंती केली आहे.  हे निवेदन देण्यासाठी पडेलचे सरपंच भूषण पोकळे, वैभव वारीक, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील, कृषी सेलचे अध्यक्ष भूषण बोडस यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरी