बांदा : बांदा परिसराला गेले काही दिवस संततधार पावसाने झोडपून काढले आहे. बुधवारी सकाळीच तेरेखोल नदीचे पाणी बांदा आळवाडी येथील मच्छीमार्केटमध्ये घुसले. काही घरांमध्ये व दुकानांमध्ये सकाळीच पुराचे पाणी घुसल्यामुळे येथील व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, महसूल, पोलीस प्रशासनाने आळवाडी येथील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.ऑगस्ट २०१९मध्ये संपूर्ण बांदा शहराला पुराच्या पाण्याने वेढले होते. त्या आठवणींनी व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन आळवाडीतील मच्छीमार्केट व बाजूच्या दुकानांमध्ये व घरांमध्ये घुसले. दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने सर्वांची तारांबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांना दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मदत केली.बांदा शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते आळवाडी मच्छीमार्केट या रस्त्याचा काही भाग बुधवारी दुपारी पाण्याखाली गेल्याने मार्ग बंद होता. दुपारनंतरही पावसाचा जोर वाढतच होता. कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी बांदा येथील आळवाडी बाजारपेठेत घुसले आहे. यामुळे शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. दुपारनंतरही पाण्याची पातळी वाढतच असून, स्थानिक प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. छोटे विक्रेते, स्टॉल, चिकन सेंटरमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बांदा आळवाडीत पुराचे पाणी घुसल्याने छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 16:53 IST
Rain SIndhudurg : बांदा परिसराला गेले काही दिवस संततधार पावसाने झोडपून काढले आहे. बुधवारी सकाळीच तेरेखोल नदीचे पाणी बांदा आळवाडी येथील मच्छीमार्केटमध्ये घुसले. काही घरांमध्ये व दुकानांमध्ये सकाळीच पुराचे पाणी घुसल्यामुळे येथील व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, महसूल, पोलीस प्रशासनाने आळवाडी येथील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
बांदा आळवाडीत पुराचे पाणी घुसल्याने छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान
ठळक मुद्देबांदा आळवाडीत पुराचे पाणी घुसल्याने छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसानतेरेखोल नदीला पूर : सामान सुरक्षित स्थळी हलविले