शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बैल गोठ्यात गेल्याच्या रागातून दाम्पत्यास मारहाण; नाधवडेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:38 IST

बैल गोठ्यात गेल्याच्या रागातून नाधवडे ब्राम्हणदेववाडी येथील मनोहर सोनू गवस (६०) आणि त्यांची पत्नी राजश्री गवस (५६) या दाम्पत्याला मुद्रस पिता-पुत्राने लाकडी दांडा व हाताने बेदम मारहाण केली. यामध्ये मनोहर गवस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

ठळक मुद्देबैल गोठ्यात गेल्याच्या रागातून दाम्पत्यास मारहाण; नाधवडेतील प्रकारपोलिसांत तक्रार;पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल

वैभववाडी : बैल गोठ्यात गेल्याच्या रागातून नाधवडे ब्राम्हणदेववाडी येथील मनोहर सोनू गवस (६०) आणि त्यांची पत्नी राजश्री गवस (५६) या दाम्पत्याला मुद्रस पिता-पुत्राने लाकडी दांडा व हाताने बेदम मारहाण केली. यामध्ये मनोहर गवस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान शेजारच्या महिलेने त्यांना सोडविल्यावर मुद्रस पितापुत्रांनी ह्यतुला बघून घेतोह्ण अशी धमकीही दिल्याची तक्रार मनोहर गवस यांनी दिली असून पोलिसांनी मुद्रस पिता-पुत्रांविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, ह्यनाधवडे ब्राम्हणदेववाडी येथील मनोहर गवस यांनी चरावयास सोडलेल्या तीन गुरांपैकी एक बैल रात्री उशिरापर्यंत घरी आला नव्हता. त्यामुळे ते बैल शोधण्यासाठी वाडीत निघाले होते. बैल शोधत ते महादेव भरडे यांच्या घराजवळ पोहोचले असता चंद्रकांत दत्ताराम मुद्रस आणि गुरुप्रसाद चंद्रकांत मुद्रस हे पिता-पुत्र तेथे गेले. त्यांनी तुझा बैल आमच्या गोठ्यात आला आहे. त्या बैलाने आमच्या गोठ्यातील जनावरांना मारले असते तर? असा प्रश्न उपस्थित करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.त्यावेळी गवस यांनी शिव्या कशाला देता? अशी विचारणा करताच मुद्रस पितापुत्राने हातातील लाकडी दांडा आणि हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गवस यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने पत्नी राजश्री गवस तेथे गेल्या. त्यांनाही मारहाण करून मुद्रस पितापुत्राने गटारात ढकलून दिले.त्यानंतर शेजारील राजश्री भरडे यांनी मध्यस्थी करीत दोघांना बाजूला केले. त्यावेळी तुला बघून घेतो, अशी धमकी त्या दोघांनी दिली. या मारहाणीत गवस यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडण्यात आले.गवस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय मुद्रस पितापुत्रांविरूद्ध गुन्हा नोंदविला असून पोलीस नाईक बाबासाहेब चौगले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.गवस जखमीबैल गोठ्यात गेल्याच्या रागातून नाधवडे येथील मारहाणीत गवस यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग