शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone Sindhudurg : चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 5 कोटी 77 लक्ष रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 19:04 IST

Tauktae Cyclone Sindhudurg : तौत्के चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 60 घरांचे अंशतः तर 12 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे, 19 शाळांचे, 11 शासकीय इमारतींचे, 13 शेड्सचे, 4 सभागृहाचे आणि इतर 53 ठिकाणते अंशतः नुकसान झाले आहे. तर 782 विद्युत पोल अंशतः आणि 98 पोल पुर्णतः पडले आहेत. तर 305 विद्युत वाहिन्यांचे नुकसान अंशतः नुकसान झाले असून 1 विद्युत वाहिनीचे पुर्णतः नुकसान झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देतौत्के चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष रुपयांचे नुकसान 907 ठिकाणी झाडे कोसळण्याची घटना

सिंधुदुर्ग तौत्के चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 60 घरांचे अंशतः तर 12 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे, 19 शाळांचे, 11 शासकीय इमारतींचे, 13 शेड्सचे, 4 सभागृहाचे आणि इतर 53 ठिकाणते अंशतः नुकसान झाले आहे. तर 782 विद्युत पोल अंशतः आणि 98 पोल पुर्णतः पडले आहेत. तर 305 विद्युत वाहिन्यांचे नुकसान अंशतः नुकसान झाले असून 1 विद्युत वाहिनीचे पुर्णतः नुकसान झाल्याची माहिती आहे.एकूण 2 हजार 72 घरांचे 3 कोटी 42 लक्ष 37 हजार 10 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे 16 लक्ष 94 हजार 100 रुपये, 19 शाळांचे 8 लक्ष 75 हजार 707 रुपयांचे, 11 शासकीय इमारतींचे 1 लक्ष 70 हजार रुपयांचे, 13 शेडचे 1 लक्ष 10 हजार रुपयांचे 4 सभागृहांचे 6 लक्ष 16 हजार रुपयांचे आणि इतर 6 लक्ष 38 हजार 300 असे नुकसान झाले आहे.  जिल्ह्यात एकूण 907 ठिकाणी झाडे कोसळण्याची घटना घडली असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची  माहिती 

  •  दोडामार्ग - 44 घरांचे नुकसान झाले असून त्यामध्ये 43 घरांचे अंशतः व एका घराचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 2 शांळांचेही नुकसान झाले असून 43 ठिकाणी विद्युत पोल पडले आहेत. 43 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
  • सावंतवाडी - 116 घरांचे अंशतः तर 4 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 13 गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. 350 ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून 100 विद्युत पोलही पडले आहेत. एका सभागृहाचे अंशतः नुकसान झाले आहे.
  •  वेंगुर्ला - 87 घरांचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद असून 6 गोठ्यांचे, एका शाळेचे, 3 शासकीय इमारतींचे, 45 विद्युत पोल आणि 2 विद्युत वाहिन्यांचे अंशतः नुकसान झाले आहे.
  • कुडाळ - 302 घरांचे, 22 गोठ्यांचे, 7 शाळांचे, 2 शेडचे व 2 सभागृहांचे अंशतः नुकसान झाले असून 120 विद्युत पोलचे अंशतः नुकसान झाले आहे.
  • मालवण - 972 घरांचे अंशतः तर 7 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 25 गोठ्यांचे, 2 शाळांचे, 8 शासकीय इमारती, 157 विद्युत पोल, 10 शेडचे व एका सभागृहाचे अंशतः नुकसान झाले आहे. 412 ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
  • कणकवली - 133 घरांचे, 29 गोठ्यांचे, एका शाळेचे, 66 विद्युत पोल, 16 विद्युत वाहिन्या यांचे अंशतः नुकसान झाले आहे.
  •  देवगड - 145 घरांचे, 36 गोठ्यांचे, 4 शाळांचे, 132 विद्युत पोल, 95 विद्युत वाहिन्या यांचे अंशतः नुकसान झाले आहे.
  • वैभववाडी - 262 घरांचे, 8 गोठ्यांचे, एका शाळेचे, 120 विद्युत पोल, 35 विद्युत वाहिन्या आणि एका शेडचे अंशतः नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्ग