शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मालवणात ८, ९ रोजी सायकल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 12:25 IST

अभियान आम्ही मालवणी आणि मालवण व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ फेब्रुवारी रोजी गिअर विरहित सायकल स्पर्धा महिला व पुरुषांच्या प्रत्येकी दोन गटांमध्ये आयोजित केली आहे.

ठळक मुद्देमालवणात ८, ९ रोजी सायकल स्पर्धामहिला व पुरुषांच्या प्रत्येकी दोन गटांमध्ये स्पर्धा

मालवण : अभियान आम्ही मालवणी आणि मालवण व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ फेब्रुवारी रोजी गिअर विरहित सायकल स्पर्धा महिला व पुरुषांच्या प्रत्येकी दोन गटांमध्ये आयोजित केली आहे.सायकलींचे शहर अशी मालवणची फार पूर्वीपासून ओळख आहे आणि सायकलीचे मालवणशी एक अनोखे नाते आहे. अलीकडे सायकलींची संख्या फार कमी होत चाललेली असून स्वयंचलित दुचाकींचा वापर वाढल्यामुळे पर्यावरण प्रदूषण, व्यायामाचा अभाव, ट्रॅफिक जॅम, पार्किंग, अपघात अशा बहुविध समस्या निर्माण होत आहेत.

यामुळेच शहरातील नागरिकांमध्ये सायकलच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेचा मार्ग देऊळवाडा सागरी महामार्ग-सायबा हॉटेल- बोर्डिंग मैदान - कन्या शाळा - टोपीवाला हायस्कूल - फोवकांडा पिंपळ -नगरपरिषद - भरड नाका - एसटी स्टॅण्ड - पेट्रोल पंप - कवटकर ट्रेडर्स - सागरी महामार्ग देऊळवाडा असा असणार आहे.

यात शनिवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी महिला लहान गट - वय वर्षे १५ व त्या खालील मुली, महिला मोठा गट - वय वर्षे १६ ते वय वर्षे ४० पर्यंत तर ९ फेब्रुवारी रोजी सकाळी पुरुष लहान गट - वय वर्षे १५ व त्या खालील मुलगे, पुरुष मोठा गट - वय वर्षे १६ ते वय वर्षे ४० पर्यंत अशा गटात स्पर्धा होणार आहे.मोठ्या गटात अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार व उत्तेजनार्थ ५०० रुपये तर लहान गटात अनुक्रमे २ हजार, १ हजार, ८०० रुपये व उत्तेजनार्थ ३०० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.सर्व यशस्वी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. नांवनोंदणीसाठी रवी तळाशिलकर, अरविंद सराफ, हर्षल बांदेकर, दिलीप बांदेकर यांच्याशी संपर्क साधावा. तरी नागरिकांनी या पर्यावरणस्नेही उपक्रमात भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन केले आहे.

 

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्ग