शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कणकवली बाजारपेठेत का होत आहे गर्दी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:19 IST

कणकवली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असतानाही कणकवली शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दाखल होणारे अनेक नागरिक काळजी व उपाययोजना ...

ठळक मुद्देपोलिसांची कारवाई, दुपारनंतर शहरात गस्त

कणकवली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असतानाही कणकवली शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दाखल होणारे अनेक नागरिक काळजी व उपाययोजना अमलात आणत नसल्याचे दिसून येत आहे. खरेदीसाठी मोठी गर्दी केली जात आहे. त्यामुळे पोलिसांना गर्दी पांगविण्यासाठी कारवाई करावी लागत आहे. पोलिसांनी शहरात गस्त घालायला सुरुवात केल्यावर बाजारपेठेतील गर्दी काहीशी कमी झाली.

कोरोना विषाणूचा धोका वाढत असताना आणि शासनाने निर्बंध घातले असताना नागरिक मात्र बेफिकीर राहून रस्त्यावर येत आहेत. भाजीपाला, किराणा व दुधासह जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना गर्दी करीत असल्याने कोरोनाचे संकट कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कणकवली शहरातील काही किराणा दुकानांसमोर खरेदीसाठी रांगा न लावता अनेक नागरिक गर्दी करीत असल्याचे पहायला मिळत आहे. पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शहरात बाहेरील नागरिक दुचाकीवरून येत असून गर्दी करीत आहेत.

नागरिकांना आवर घालणे कठीणशहरातील होलसेल दुकानात विशेषत: मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी शहरातील पूर्ण बाजारपेठ बंद होती. औषधांची दुकाने वगळता सर्व दुकानांसह भाजी विक्रीही बंद ठेवण्याचा निर्णय कणकवली व्यापारी संघ, नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या घेतला होता. त्यामुळे बुधवारी ही गर्दी उसळली होती. प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी उपाययोजना केली जात असताना नागरिकांना आवर घालणे कठीण झाले आहे. कणकवली शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असले तरीही छोट्या मोठ्या मार्गांनी नागरिक शहरात येत आहेत. 

 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस