शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली मुख्य धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, काही काळ वाहतूक कोंडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:02 IST

वर्षा पर्यटन हंगाम लवकर सुरू झाला, वाहतूक पोलिस कार्यरत

आंबोली : मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे आंबोलीतील वर्षा पर्यटन हंगाम लवकर सुरू झाला. जून महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यांत आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर धबधबेही पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत. त्यामुळे आंबोलीकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी आंबोलीमध्ये हजेरी लावली होती. यात कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव, धारवाड, गोवा तसेच सिंधुदुर्गातील पर्यटक मोठ्या संख्येने होते. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आंबोली येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.मुख्य धबधब्यासह इतर धबधब्यांवरही मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली होती. यावेळी या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचीही मोठी कुमक हजर होती. हिरण्यकेशी नदीचा उगम कावळेशेत दरी महादेव गड पॉइंट या ठिकाणीही पर्यटकांनी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार न होता रविवारी मोठ्या संख्येने पर्यटकांनी आंबोलीतील वर्षा पर्यटनाचा आनंद लुटला. मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. परंतु ती वाहतूक पोलिसांनी कार्यरत असल्यामुळे ती वाहतूक कोंडी सुटली.