भवानगड यात्रेला भाविकांची गर्दी

By Admin | Updated: January 7, 2015 23:58 IST2015-01-07T22:21:28+5:302015-01-07T23:58:44+5:30

प्रचंड गर्दी : पौष पौर्णिमेला गडावर लोटला भाविकांचा मेळा; अपूर्व उत्साह

The crowd of devotees on the Bhavangarh Yatra | भवानगड यात्रेला भाविकांची गर्दी

भवानगड यात्रेला भाविकांची गर्दी

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील भवानगड येथे पौष पौर्णिमेच्या दिवशी देवीची मोठी यात्रा भरते. यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होते. यावर्षी सोमवारी भरलेल्या या यात्रेला भाविकांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गडावरील वातावरण धार्मिक कार्यक्रमानी मंत्रमुग्ध झाले होते. देवीच्या दर्शनासाठी गडाच्या पायथ्यापासून भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या.
संगमेश्वर तालुक्यातील भवानगड पुरातन किल्ल्यावर भवानी मातेचे आकर्षक असे पुराणकालिन मंदिर आहे. हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हा गड चिखली आणि राजवाडी या दोन्ही गावांच्या मध्यभागी आहे. गडावर नवरात्रोत्सव, होळी, पौर्णिमा असे विविध कार्यक़्रम साजरे केले जातात. गडाच्या पायथ्यापर्यंत कच्चा रस्ता असून, पायथ्यापासून अर्धा तास चालत जावे लागते. मात्र, तरीही भाविक भक्तिभावाने गडावरील उत्सव साजरे केले जातात. गडाच्या पायथ्यापर्यंत कच्चा रस्ता असून, पायथ्यापासून अर्धा तास चालत जावे लागते. मात्र, तरीही भाविक भक्तिभावाने गडावरील उत्सव साजरे करत असतात. याहीवर्षी पौष पौर्णिमेच्या दिवशी गडावर मोठी यात्रा भरली होती. हजारो भाविकांनी सकाळी ६ वाजल्यापासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. गडावर दिवसभर होमहवन, भजन, देवीची विधीयुक्त पूजा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गडावर विविध धार्मिक कार्यक़्रम मोठ्या भक्तिभावाने भाविक साजरे करत असतात. गडाच्या भोवती पाण्याची पुरातन १४ कुंड आहेत. गडावर इतिहासातील अनेक पुरातन बाबी आढळून येतात. हा गड आणि येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी काही प्रमाणात पर्यटकही गडावर येत असतात. मात्र, कडवईमार्गे भवानगडावर जाणारा रस्ता हा अत्यंत खराब आहे. या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
गडावर असणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास येथील गावाची पाण्याची समस्याही मार्गी लागू शकते. मात्र, ही पाण्याची तळी सध्या गाळाने भरत आहेत. गडावर जाणारा मार्ग सुकर झाल्यास भाविक मोठ्या संख्येने येऊ शकतील. गडावरील भवानी मातेचे मंदिज जीर्ण झाले असून, त्याचा जिर्णोद्धार होणे गरजेचे आहे. अशा यात्रांच्या माध्यमातून होणारी भाविकांची गर्दी पाहता येथे शासनाच्या माध्यमातून सोयीसुविधा उपलब्ध झाल्यास भाविकांची संख्या वाढू शकते. या यात्रेला आमदार सदानंद चव्हाण, उपसभापती संतोष थेराडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The crowd of devotees on the Bhavangarh Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.