शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 18:27 IST

अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत.

आरोस : हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा तिन्ही ऋतू सिंधुदुर्गवासीयांना काल, शुक्रवारी एका दिवसात पाहायला मिळाले. सकाळी पहाटेची थंडी, त्यानंतर कडक उन्ह आणि दुपारनंतर अवकाळी पावसाची मोठी सर कोसळली. अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत.बांदा दशक्रोशीला अवकाळी पावसाने अर्धा तास झोडपले. तसेच परिसरात गावातील काढणीयोग्य पिकलेले लाल झालेले नाचणी कणस व उडवी करून ठेवलेल्या भात पिकांचे व विलवडे येथील कनगी (कंदमुळे) चे  नुकसान होण्याची शक्यता आहे.    सायंकाळी उशिरा पर्यंत पावसाची रिमझिम सुरु होती. यामुळे आंबा व काजूवर केलेल्या दोन फवारण्या वाया जाणार असल्याने बागायतदार चिंतातुर झाले आहेत. अवकाळी पाऊस असाच सुरु राहल्यास सर्व मेहनत वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.बांदा, पाडलोस, मडुरा, शेर्ले, रोणापाल, विलवडे, कास, इन्सुली, वाफोली,डेगवे  परिसरात दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली. मळणीसाठी तयार करून ठेवलेली भाताची उडवी झाकण्यासाठी शेतकरी धडपडत होते.

तर आंबा व काजूवर सुरू असलेली फवारणी काही बागायतदारांना बंद करावी लागली. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या फवारणीचा खर्च पाण्यात गेल्याचे बागायतदारांनी सांगितले. मात्र या अवकाळी पावसाने बागायतदारांसह छोट्या शेतकऱ्यांचीही झोप उडवली. बांदा शहरात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी अचानक आलेल्या पावसामुळे दुकानांचा आसरा घेतला.दरम्यान, शासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पिकांचे पंचनामे करावेत व कर्जदार आंबा व काजू बागायतदारांना अनुदान स्वरूपात दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात शुक्रवारी दमदार पाऊस झाला आहे. आक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस होताच आता नोव्हेबरमध्येही पाऊस पडत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस