शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'त्या' १८ केंद्रांवर अडकलेल्या पीक विमा रक्कमेचे वाटप सुरू

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 21, 2023 17:40 IST

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५८ हवामान केंद्रे आहेत. त्यातील १८ केंद्रांवर वातावरणाचे रीडिंग होत नव्हते. त्यामुळे फळ पीक विम्याची ...

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५८ हवामान केंद्रे आहेत. त्यातील १८ केंद्रांवर वातावरणाचे रीडिंग होत नव्हते. त्यामुळे फळ पीक विम्याची या केंद्रांवरील रक्कम अडकली होती. परंतु भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आणि रिलायन्स इन्श्युरंस कंपनीचे राष्ट्रीय प्रमुख थॉमस आणि महाराष्ट्र प्रमुख पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही रक्कम मिळवून घेतली आहे. त्यामुळे आता या १८ केंद्रांवरील विमा रक्कम वाटप सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १७ हजार ५५६ हेक्टर क्षेत्रासाठी ६७ कोटी रुपये ३८ हजार ३७३ शेतकऱ्यांना ही रक्कम मंजूर झाली आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, कोकण विभाग संघटक डॉ भाई बांदकर, मालवण अध्यक्ष महेश सारंग, समर्थ राणे आदी उपस्थित होते. यावेळी सावंत यांनी फळ पीक विमा योजनेसाठी विरोधकांनी खूप प्रसिद्धी घेतली. परंतु प्रत्यक्षात ही रक्कम मिळण्यासाठी आपण १० ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीयमंत्री, पालकमंत्री, आयुक्त यांना पत्र दिले होते. तेथून हा विषय चाळवला गेला. मात्र, यासाठी खोलात जावून उमेश सावंत यांनी अभ्यास करीत कृषीचे वरिष्ठ अधिकारी आणि विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत आहे.ते पुढे म्हणाले, पीक विमा रक्कम मिळावी, यासाठी भाजप पहिल्या पासून सकारात्मक होते. जिल्ह्यात सुरुवातीला ४० हवामान केंद्रे मंजूर होती. त्यात १८ केंद्रे वाढवून घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात ५८ केंद्रे झाली. विमा कंपनीने नुकसान देण्यास सुरुवात केली. त्यावेळी यातील ४० केंद्रांना ही रक्कम मंजूर झाली. कारण १८ केंद्रांवर रीडिंग होत नव्हते. त्यामुळे उमेश सावंत यांनी याचा बारकाईने अभ्यास करीत कृषी अधिकारी व विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत वारंवार बैठका घेत बंद असलेल्या केंद्रांच्या नजिक असलेल्या केंद्रांच्या आधारे ही रक्कम देण्यासाठी विमा कंपनीला भाग पाडले. परिणामी २० नोव्हेंबर पासून रखडलेल्या १८ केंद्रांवरील रक्कम देण्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठ दिवसांत ही रक्कम सर्व बाधितांना जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी