कलचाचणी अहवाल आॅनलाईन घोषित
By Admin | Updated: May 6, 2017 17:18 IST2017-05-06T17:18:28+5:302017-05-06T17:18:28+5:30
अहवाल मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द

कलचाचणी अहवाल आॅनलाईन घोषित
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. 0४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २0१७च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ठ होणा-या विद्याथर््यांची कलचाचणी दिनांक ९ फेब्रुवारी २0१७ ते ३ मार्च २0१७ या कालावधीत घेण्यात आली होती.
या कलचाचणीचा कल अहवाल मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांंनी त्यांचा बैठक क्रमांक नोंदवून कल अहवाल आॅनलाईन पहावा. हा कल अहवाल इयत्ता १0 वीच्या गुणपत्रकाबरोबर छापील स्वरुपात देण्यात येणार आहे असे, पुणे राज्य मंडळाचे सचिव, कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.