शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 16:13 IST

Police Kankavli Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेला असताना कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी व आक्षेपार्ह घोषणा दिल्याबाबत नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू यांच्यासह सात जणांवर व अन्य तीन ते चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

ठळक मुद्देकणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हा दाखलगीतेश कडू, कन्हैया पारकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेला असताना कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी व आक्षेपार्ह घोषणा दिल्याबाबत नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू यांच्यासह सात जणांवर व अन्य तीन ते चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत गुरुवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षकांना निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्याची तत्काळ दखल घेत शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झालेल्या मध्ये कन्हैया पारकर (कणकवली), गीतेश कडू ( आचिणें- वैभववाडी), ललित घाडीगावकर (वागदे), सचिन पवार ( कलमठ ), किरण वर्दम ( साकेडी ) , वैभव माळकर ( कणकवली ) , निसार शेख ( कलमठ) व अन्य तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .आमदार नितेश राणे यांच्या विरोधात १७ मार्च रोजी सकाळी घोषणाबाजी व फलकबाजी केल्याबद्दल या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कणकवली तालुका भाजपा शिष्टमंडळाच्यावतीने पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली आहे. नरडवे नाक्यासमोर १७ मार्च रोजी शिवसेना कार्यालयासमोर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी नीतेश राणे यांच्या विरोधात मनाई आदेशाचा भंग करत बेकायदा जमाव केला .मनाई आदेशाचा जाणीवपूर्वक भंगयावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, ललित घाडीगावकर, निसार शेख, उमेश गुरव, प्रतीक रासम, सचिन पवार, किरण वर्दम अशा कार्यकर्त्यांनी नीतेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मनाई आदेशाचा शिवसेना कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक भंग झाला आहे.तसेच त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तरी संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी भाजपा शिष्टमंडळातर्फे करण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी पडताळणी करून गुन्हा दाखल केला. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारीKankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशन