सिंधुदुर्गात भरणार चित्रशिल्प कलासंमेलन

By Admin | Updated: January 1, 2015 00:12 IST2014-12-31T22:23:58+5:302015-01-01T00:12:59+5:30

अखंड लोकमंचचा उपक्रम : ८ ते २३ जानेवारी या कालावधीत प्रत्येक तालुक्यांत बालचित्रकला स्पर्धा

Craftsmanship in Sindhudurg | सिंधुदुर्गात भरणार चित्रशिल्प कलासंमेलन

सिंधुदुर्गात भरणार चित्रशिल्प कलासंमेलन

कणकवली : अखंड लोकमंचमार्फत कणकवली येथे अखिल भारतीय चित्रशिल्प कलासंमेलन होणार आहे.
वातावरण निर्मितीसाठी जिल्हा बालचित्रकला अभियान राबविण्यात येत आहे. बालकांसाठी ही केवळ स्पर्धा नसून त्यांच्या कलाविषयक जाणिवा प्रगल्भ करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक तालुक्यांत पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना आवडीची चित्रे काढता येणार आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात बाल व कुमार गटांतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला अभियान घेतले जाणार आहे.
पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांतील मुलांना प्रत्येक तालुक्यांतील माध्यमिक विद्यालयातील केंद्रावर जाऊन चित्रे काढायची आहेत. त्यासाठी अखंड लोकमंच कागद पुरविणार आहे.
या चित्रांचे प्रदर्शन अखिल भारतीय चित्र-शिल्प संमेलनात होणार आहे. यातून प्रत्येकी शंभर मुलांमधून पाच उदयोन्मुख चित्रकार निवडले जाणार आहेत. या बालचित्रकारांचा चित्र-शिल्प संमेलनात सत्कार करण्यात येणार आहे. त्यांना नामवंत चित्रकार मार्गदर्शन करणार असल्याचे अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक आणि प्रा. विजय जामसंडेकर यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे राजेश कदम, संतोष राऊळ, बाबल महाडिक, विनायक सापळे, राखी अरदकर, प्रशांत काणेकर, गोपी पवार, मारुती पालव, समीर गुरव, राजेश सरकारे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


८ जानेवारीपासून चित्रकला स्पर्धा
देवगड आणि वैभववाडी येथील केंद्रांवर ८ व ९ जानेवारी, कुडाळ आणि वेंगुर्ले तालुक्यांत १२ व १३ जानेवारी, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत १५ व १६ जानेवारी, कणकवली आणि मालवण तालुक्यांत २१ ते २३ जानेवारी या कालावधीत चित्रकला स्पर्धा होणार आहे. नोंदणी ५ जानेवारीपर्यंत करावी. देवगड-मृत्युंजय मुणगेकर (गोगटे हायस्कूल जामसंडे), नारायण हजेरी (मोंड हायस्कूल), राजेंद्र कोयंडे (शेठ म. ग. देवगड), कुडाळ-हरी परब, संदीप केरवडेकर, दिनेश मेस्त्री (न्यू शिवाजी हायस्कूल, जांभवडे), कणकवली-मारुती पालव, समीर गुरव, गजानन तायशेटे (फोंडा), वैभववाडी-अलोक गोसावी, सदानंद हिंदळेकर, सावंतवाडी-वालावलकर, दादा मालवणकर, वेंगुर्ले-राजेश आजगावकर, मालवण- सावंत, राखी अरदकर, बांदा -अमित कुबडे.

Web Title: Craftsmanship in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.