शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: आरोंदा खाडीपात्रातील वाळू तस्करांना दणका; एक बोट जाळली, सात बोटी ताब्यात

By अनंत खं.जाधव | Updated: April 4, 2023 18:05 IST

महसूल व पोलिस प्रशासनाने दिला दणका

सावंतवाडी : आरोंदा येथील खाडीपात्रात बेकायदा वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करांना आज, मंगळवारी महसूल व पोलिस प्रशासनाने दणका दिला. या कारवाईत तब्बल सात बोटी ताब्यात घेतल्या तर एक बोट जाळून टाकण्यात आली. याप्रकरणी दोघा परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच कांदळवनात असलेली झोपडीला नष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य काही जण पळून गेले. ही कारवाई सावंतवाडी तहसिलदार अरुण उंडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पोलिसांनी केली. दरम्यान या बोटी नेमक्या कुणाच्या? याची चौकशी सुरू असून बोटी मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार उंडे यांनी सांगितले.आरोंदा येथील खाडीत गोव्यातील काही लोकांकडून बेकायदा वाळू उपसा केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उंडे यांनी सावंतवाडी पोलिसांना मदतीने त्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी आठ बोटी आढळून आल्या. त्यातील एक बोट जाळून टाकण्यात आली असून उर्वरित सात बोट ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच याप्रकरणी दोघा परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेण्यात आले आहे.गेले अनेक दिवस वाळू तस्करीच्या तक्रारी होत्या. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र संबधितांच्या बोटीत वाळू आढळली नाही तर बाजूला वाळूचा मोठा साठा आढळून आला आहे. तो ताब्यात घेण्यात आला असून ही वाळू नेमकी कोणाची? बोटी कोणाच्या? याची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे, असे उंडे म्हणाले. या कारवाईत मंडळ अधिकारी विनायक कोदे, गुरूनाथ गुरव, तलाठी पास्ते कविटकर गावडे, खान मुळीक, नागराज गोरे, पाटोळे तसेच पोलिस उपनिरीक्षक आनंद यशवंते आदीनी सहभागी झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गsandवाळूPoliceपोलिस