शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

बालकांच्या आरोग्य तपासणीबरोबरच समुपदेशन करावे- जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 6:50 PM

collector Sindhudurg :  कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांची आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी करण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन करावे. कौशल्य विकास विभाग आणि आरसेटीने प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांची यादी अंतिम करताना विधवा महिला तसेच पालक गमावलेल्या 18 वर्षापुढील बालकांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले.

ठळक मुद्दे बालकांच्या आरोग्य तपासणीबरोबरच समुपदेशन करावेविधवा महिला, 18 वर्षापुढील मुलांना प्राधान्य द्यावे- जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग  :  कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांची आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी करण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन करावे. कौशल्य विकास विभाग आणि आरसेटीने प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांची यादी अंतिम करताना विधवा महिला तसेच पालक गमावलेल्या 18 वर्षापुढील बालकांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले.कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हा स्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी संजित महोपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. दीपक म्हालटकर, पोलीस उपअधिक्षक संध्या गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी आदी उपस्थित होते. 

बैठकीला कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त सुनील पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, शिवराज गायकवाड, नितीन गाढवे, सुरज कांबळे, अवधुत तावडे, संतोष जिरगे, जयंत जावडेकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांचे निर्देश -

  • बालकांना धान्य वितरण करा. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्राधान्य द्या.
  • संजय गांधी, इंदिरा गांधी अशा शासकीय योजनांचे लाभ विधवा महिला, बालकांना देण्याबाबत तहसिलदारांना सूचना
  • नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील मुलांना वैयक्तिक भेट देऊन विचारपूस करावी. सामाजिक संघटनांच्या मदतीने या मुलांना शिकवण्यासाठी तसेच इतर आवश्यक मदतीसाठी प्रयत्न करावेत
  • मुलांच्या करिअर मार्गदर्शनासाठी आवश्यक प्रयत्न व्हावेत.
  • उत्पन्नाचे दाखले देण्याबाबत तहसिलदारांना पत्र पाठवावे. त्याशिवाय तालुकानिहाय प्रलंबित दाखल्यांची यादी द्यावी. 

पोलीस अधीक्षक दाभाडे यांच्या सूचना

  •  एका पालकाचा कोविडने मृत्यू झाला आहे आणि दुसऱ्या पालकाचा अन्य कारणाने मृत्यू झाला असल्यास याची माहिती पोलीस विभागाने घ्यावी
  •  आरोग्य विभागाने विशेषतः महिला समुपदेशकांनी 14 वर्षांपुढील मुलींशी भेटून विचारपूस करून त्यांच्या वैयक्तिक समस्यांबाबत समुपदेशन करावे.
  • जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी विषय वाचन करून माहिती दिली. जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 13 असून, एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 188 आहे. 256 विधवा महिला आहेत.
टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग