पत्रव्यवहार झाला इतिहासजमा

By Admin | Updated: July 27, 2014 21:49 IST2014-07-27T21:45:04+5:302014-07-27T21:49:13+5:30

प्राचीन काळी संपर्काची माध्यमे उपलब्ध नव्हती

Correspondence history | पत्रव्यवहार झाला इतिहासजमा

पत्रव्यवहार झाला इतिहासजमा

सुरेश पवार - दस्तुरी , प्राचीन काळी संपर्काची माध्यमे उपलब्ध नव्हती. एखादा संदेश पोचवण्यासाठी माणूस चालत अथवा घोड्यावरून जायचा. काहीवेळा निरोप उशिराने मिळत. मात्र, अन्य पर्याय नसल्याने माणसाचा नाईलाज व्हायचा. कालांतराने अनेक बदल झाले.विज्ञान, तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली. छपाई यंत्राचा शोध लागला, पोस्टाची निर्मिती झाली व माणसाला संपर्काचे प्रभावी साधन मिळाले. पत्रव्यवहार सुरु झाले. माणसाच्या भावभावनांना व्यक्त करण्याचे साधन मिळाले. तत्काळ निरोपासाठी ‘तार’ निघाली. मात्र, विज्ञानात बदल झाले आणि दूरध्वनीचा (फोन) शोध लागला. पण, सर्वसामान्यांना फोन परवडणारा नसल्याने पत्रव्यवहार सोयीचा वाटे. परंतु पुढील काळात क्रांती घडवणारा मोबाईल आला आणि माणसाचे अवघे जीवन बदलून गेले.मोबाईल प्रत्येकाची गरज बनला. पत्र, तार, फॅक्स या सर्वांना मोबाईलने केव्हाच मागे टाकले. पत्रव्यवहार तर इतिहासजमा झाला. आता मेसेज, इंटरनेट, फेसबुक, व्हॉटस्अपमुळे माणसाला अवघे जग मुठीत आल्यासारखे झाले. काही सेकंदात माहितीचे आदान - प्रदान होऊ लागले. तंत्रज्ञानाने किती प्रगती केली तरी माणसाच्या भावना बदलू शकत नाहीत. कित्येक महिन्यानी येणाऱ्या पत्राची चातकाप्रमाणे वाट पाहणारा माणूस मेसेजेसची कधीच वाट पाहात नाही. पत्रातील भावनिक नाते अजिबात दिसत नाही.

Web Title: Correspondence history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.