शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

Coronavirus Unlock : मुंबईच्या प्रवासासाठी वेंगुर्ल्याच्या लालपरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:55 IST

वेंगुर्ला आगारातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा ते मुंबई असा प्रवास करू इच्छिणाऱ्यांना खूषखबर देण्यात आली आहे. यासाठी विठाई एक्स्प्रेस आणि साई मानसीश्वर या दोन लालपरी वेंगुर्ला-शिरोडा ते बोरिवली पर्यंतच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, अशी माहिती वेंगुर्ला आगारप्रमुख एन. डी. वारंग यांनी दिली.

ठळक मुद्देमुंबईच्या प्रवासासाठी वेंगुर्ल्याच्या लालपरी सज्जप्रवासी संख्या २२ : आधारकार्ड आवश्यक

वेंगुर्ला : वेंगुर्ला आगारातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा ते मुंबई असा प्रवास करू इच्छिणाऱ्यांना खूषखबर देण्यात आली आहे. यासाठी विठाई एक्स्प्रेस आणि साई मानसीश्वर या दोन लालपरी वेंगुर्ला-शिरोडा ते बोरिवली पर्यंतच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, अशी माहिती वेंगुर्ला आगारप्रमुख एन. डी. वारंग यांनी दिली.यावेळी वारंग पुढे म्हणाले की, शिरोडा, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, राजापूर, लांजा, हातखंबा, संगमेश्वर, चिपळूण, महाड, माणगाव, पेण, पनवेल, खारघर, तुर्भेनाका, कळवा, ठाणे, मुलुंड, भांडूप, चेंबूर, सायन, दादर, परेल, बांद्रा, अंधेरी, मालाड, गोरेगांव, कांदिवली, बोरिवली असा या बसचा प्रवास असणार आहे.शासनाच्या नियमांनुसार बसमधील प्रवासी संख्या २२ असणार आहे. तसेच बसमधील २२ सीटचा ग्रुप पूर्ण झाल्यानंतरच बस सुटणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यायची आहे. तसेच प्रवासात आधारकार्ड, मेडिकल सर्टिफिकेट सोबत असणे आवश्यक असणार आहे. या गाडीचा तिकीट दर शिरोडा ते बोरिवली ३४०० रुपये व वेंगुर्ला ते बोरिवली ३३०० रुपये असा ठेवण्यात आला आहे. बुकींगसाठी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहनही एन. डी. वारंग यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग