शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनामुळे वर्षभर उभ्या राहूनही सावंतवाडी आगाराच्या बसेस तंदुरुस्त, असं केलं नियोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 15:38 IST

ST Bus News:  कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद असल्याने याचा मोठा फटका एसटी सेवेला बसत आहे. प्रवासी नसल्याने एसटीचा आर्थिक डोलारा कोलमडला अाहे.

- रजत सावंतसावंतवाडी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने टाळेबंदी लागू केली असून, आजपासून काही ठिकाणी निर्बंध शिथिलही केले आहेत. कोरोनाने एकीकडे नागरिकांचे आराेग्य खालावत असताना वर्षभर आगारात उभ्या असलेल्या येथील एसटी आगाराच्या बसेसचे आराेग्य मात्र तंदुरुस्त असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद असल्याने याचा मोठा फटका एसटी सेवेला बसत आहे. प्रवासी नसल्याने एसटीचा आर्थिक डोलारा कोलमडला अाहे. सावंतवाडी आगाराच्या ७५ बसेस वाहतूक बंद राहिल्याने वर्षभरापासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थही शहरात खरेदीसाठी येत नाहीत. त्यामुळे प्रवासीच नसल्याने बस वर्षभरापासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. टाळेबंदीमध्ये सावंतवाडी एसटी प्रशासनाने चार फेऱ्या चालू ठेवल्या आहेत. दरम्यान, टाळेबंदीच्या सुरुवातीला गेल्या वर्षी एसटी फेऱ्या बंद असल्याने त्यांचे काही भाग दुरुस्तीला येऊन सावंतवाडी आगाराला दिवसाला पाच लाखांचे नुकसान सहन करावे लागले होते. यावर उपाय म्हणून सध्या एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या बस गाड्यांना तीन दिवसांनंतर आगारातील मोकळ्या जागेत फिरवून चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे एसटीच्या भागांची गंजल्यामुळे किंवा इतर कारणाने झीज होत नसल्याचे आगाराकडून सांगण्यात अाले. त्यामुळे सधा नादुरुस्त बसची संख्या शून्यवर आहे.

 सावंतवाडी आगराच्या एकूण बसेस -७५    टाळेबंदी काळात चालू बसेस - ४    उभ्या बसेस - ७१    नादुरुस्त बसेस - ० 

 वर्षातून फक्त सहा महिने रस्त्यावर टाळेबंदीमुळे गेल्या वर्षभरात एसटी सहा महिने चालू होती. सहा महिन्यांमध्ये सावंतवाडी आगराच्या ७५ बसेस ह्या प्रवाशांच्या सेवेसाठी आगाराबाहेर पडल्या होत्या. सद्यस्थितीत या आगराच्या चार एसटी फेऱ्या चालू आहेत.

आता खर्च किती येणारयाबाबत सावंतवाडी एसटी प्रशासनाला विचारले असता सध्या बसेस आगाराबाहेर जात नाहीत. त्यामुळे तीन दिवसांनी बसेस चालू करून आगाराच्या आवारात फिरवल्या जात आहेत. काही बस चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे बसेस सुरू करायच्या म्हटल्यास खर्च येणार नाही़. मात्र, काही बसना खर्च करावा लागत आहे.

 आधीच दुष्काळगेल्या वर्षभरात सावंतवाडी आगराची सहा महिने बस वाहतूक बंद होती. त्यामुळे एसटीला १० कोटींचे नुकसान झाले आहे. बस फेऱ्या बंद असल्याने दिवसाला सुमारे पाच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

बस गाड्या चांगल्या स्थितीत राहाव्यात आणि देखभाल दुरुस्ती खर्च कमी यावा म्हणून दर तीन दिवसांनी बस गाड्या चालू करून आगराच्या आवारात फिरवल्या जातात. त्यामुळे इंजिन तसेच टायर खराब होत नाहीत. असे केल्याने बसेस चालू करायच्या झाल्यास खर्च कमी होईल.   - आगार व्यवस्थापक, सावंतवाडी

टॅग्स :state transportएसटीSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग