शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : घरातच थांबण्याच्या आदेशाला हरताळ, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक आंबोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 19:56 IST

जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांना पुढील काही दिवस घरी थांबण्याचे आदेश असतानाही या आदेशाचे उल्लंघन करत ते पुन्हा बैठकीनिमित्त शनिवारी आंबोली येथे आल्याने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूरचे उपवनसंरक्षक बैठकीच्या निमित्ताने आंबोलीतसिंधुदुर्ग प्रशासनाने चौकशी सुरू करताच कोल्हापूरकडे प्रयाण

सावंतवाडी : जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांना पुढील काही दिवस घरी थांबण्याचे आदेश असतानाही या आदेशाचे उल्लंघन करत ते पुन्हा बैठकीनिमित्त शनिवारी आंबोली येथे आल्याने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने माहिती मिळताच लागलीच चौकशी सुरू केली पण तोपर्यंत ते आंबोलीतून कोल्हापूरकडे निघून गेले होते. दरम्यान धुमाळ यांची चौकशी करण्याचा आदेश यापूर्वीच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी दिले आहेत.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी आहे. असे असतानाही कोल्हापूर परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक हनमंत धुमाळ हे जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत शासकीय वाहनातून खाजगी चालक घेत सातारा येथे गेले होते. तेथे ते परवानगी विना राहिले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर येथील शहाजी देसाई यांनी केली होती.

या मागणीनंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी कोल्हापूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक क्लॅमेंट बेंन यांना चौकशीचे आदेश दिले होते. ही सध्या चौकशी सुरू असून, धुमाळ यांना कोल्हापूर येथेच थांबण्याचे आदेश दिले होते. त्यांना बाहेर पडू नका असे स्पष्टपणे बजावले होते.मात्र शनिवारी सकाळी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक क्लॅमेंंट बेंन हे हत्ती बांधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी दोडामार्ग येथे आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत धुमाळ असल्याचे अनेकांनी पाहिले असल्याने लागलीच या घटनेची चौकशी सुरू झाली. तसेच दोडामार्गमधील पाहणी संपवून बेन व धुमाळ हे दोघेही आंबोली येथील विश्रामगृहावर दाखल झाले होते.

तोपर्यंत आंबोली दूरक्षेत्राच्या पोलिसांनी विश्रामगृहावर जाऊन या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच विचारणाही केली. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनाही याबाबत माहिती मिळताच त्यांनीही प्रांताधिकारी सुशात खांडेकर यांना माहिती दिली.या घटनेची चर्चा जोर धरू लागल्याचे कळताच मुख्य वनसंरक्षक क्लॅमेंंट बेंन यांच्यासह उपवनसंरक्षक धुमाळ यांनी आंबोलीतून काढता पाय घेत थेट कोल्हापूर गाठले आहे. बैठकीबाबत जिल्हाप्रशासनाने ही माहिती घेतल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान सावंतवाडी तहसीलदार म्हात्रे यांना विचारले असता त्यांनीही दुजोरा दिला असून, कोल्हापूर येथील काहींनी आम्हाला फोनवरून माहिती दिली आहे. त्याप्रमाणे आम्ही चौकशी केली असल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनkolhapurकोल्हापूर