वैभववाडी : येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमात लंडन येथील रोहेम्पटन लायब्ररीच्या ग्रंथपाल डॉ. जॅनिस फर्नांडिस यांनी रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर आॅनलाईन व्याख्यान दिले. त्यामुळे लंडनमधील व्याख्यानाच्या प्रोफाईलमध्ये वैभववाडी महाविद्यालयाच्या नावाची नोंद झाली आहे.महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आॅनलाईन आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रंथालय व आयक्यूएसी विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला. संशोधनाच्या विविध विषयांवर नामांकित ग्रंथपाल, प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सहसचिव शैलेंद्र रावराणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात देशभरातून १३० प्राध्यापक, ग्रंथपाल सहभागी झाले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी केली. शिवाजी विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी संशोधन या विषयावर बीजभाषण केले.प्रमुख वक्ते म्हणून लंडन येथील रोहेम्पटन लायब्ररीच्या ग्रंथपाल डॉ. जॅनिस फर्नांडिस यांनी रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर आॅनलाईन व्याख्यान दिले. नागपूर विद्यापीठातून डॉ. मंगला हिरवाडे, डॉ. शालिनी लिहीतकर, दिल्ली विद्यापीठातून डॉ. मारगम मधुसूदर, मुंबईतून डॉ. अजय कांबळे, ग्रंथपाल प्रल्हाद जाधव व डॉ. प्रणव शास्त्री यांनी मार्गदर्शन केले.
CoronaVirus Lockdown :फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमात लंडनमधून आॅनलाईन व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:18 IST
वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमात लंडन येथील रोहेम्पटन लायब्ररीच्या ग्रंथपाल डॉ. जॅनिस फर्नांडिस यांनी रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर आॅनलाईन व्याख्यान दिले. त्यामुळे लंडनमधील व्याख्यानाच्या प्रोफाईलमध्ये वैभववाडी महाविद्यालयाच्या नावाची नोंद झाली आहे.
CoronaVirus Lockdown :फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमात लंडनमधून आॅनलाईन व्याख्यान
ठळक मुद्देफॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमात लंडनमधून आॅनलाईन व्याख्यान रावराणे महाविद्यालयात आयोजन