शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:19 IST

मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेबाबत गावच्या सरपंचांना अनेक समस्या आहेत. क्वारंटाईन केंद्राची जबाबदारी सरपंचांवर आहे. मात्र, या केंद्राची रात्रीची जबाबदारी कोणावर याचे उत्तर राज्यसरकार देत नाही. सरपंचांना कोरोना मोहिमेत येणाऱ्या अडचणी संबंधितांशी बोलून सोडवू, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.

ठळक मुद्देव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवादकोरोनाबाबतच्या समस्या लवकरच सोडवू  : नीतेश राणे यांचे आश्वासन 

देवगड : मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेबाबत गावच्या सरपंचांना अनेक समस्या आहेत. क्वारंटाईन केंद्राची जबाबदारी सरपंचांवर आहे. मात्र, या केंद्राची रात्रीची जबाबदारी कोणावर याचे उत्तर राज्यसरकार देत नाही. सरपंचांना कोरोना मोहिमेत येणाऱ्या अडचणी संबंधितांशी बोलून सोडवू, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.आमदार राणे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत सरपंचांना येणाऱ्या अडचणी व इतर गोष्टी यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी असे आश्वासन दिले आहे.राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह इतर राज्यातून येणाऱ्या चाकरमान्यांची व्यवस्था शाळा, अंगणवाड्यांमध्ये करण्याचा सूचना गाव व्यवस्थापन कमिटीला दिल्या आहेत. परंतु गावातील शाळा व अंगणवाड्यांमध्ये जागा कमी पडत असून प्रशासन आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे देवगड तालुक्यातील सरपंचांनी सांगितले.

देवगड तालुक्यातील सरपंचांनी प्रशासना विरोधात नाराजीचा सूर लावला. आमदार राणे यांनी पोलीस प्रशासन व तहसीलदार यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरपंचांशी व्डिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आमदार राणे यांनी गाव पातळीवरील समस्या जाणून घेतल्या. शाळेत नेमण्यात आलेले शिक्षक त्यांच्या मूळ गावी गेले असल्याची खळबळजनक माहिती बापर्डे सरपंच संजय लाड यांनी दिली. त्यामुळे चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यात येत असलेल्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. याबाबत प्रशासनाला विचारले असता अधिकारी एकमेकांवर ढकलत असल्याचे लाड यांनी सांगितले.हडपीड सरपंच दाजी राणे यांनी सांगितले की, शासनाने शाळेच्या १५ बाय १५ च्या एका खोलीत ३ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. परंतु ५० व्यक्ती गावात आल्यास काय करायचे ? याचे उत्तर नसल्याचे त्यांनी सांगितले.

या महिन्यात लहान मुलांसाठी डोस असून तो पुढील महिन्यात घेण्यात यावा. कारण कोरोनासाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारीच डोस देण्यासाठी नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे डोस पुढील महिन्यात द्यावा, अशी मागणी वैभव साळसकर यांनी केली. विश्वनाथ खानविलकर यांनी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जागा अपुरी पडणार असून शासनाकडून कोणतेच सहकार्य मिळत नाही, असे यावेळी सांगितले.जिल्हा प्रशासनाशी चर्चा करणारयावेळी नीतेश राणे म्हणाले, गावपातळीवरील यंत्रणा कशी राबवायची हे सर्व निर्णय शासनाने व गावातील नागरिकांनी घ्यायचे आहेत. या यंत्रणेला आम्ही मदत करू व तुमच्या सर्व समस्यांमध्ये लक्ष घालून जिल्हा प्रशासन यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवू, असे सांगत त्यांनी सर्व सरपंचांना तशी ग्वाही दिली. तसेच उद्यापर्यंत सर्व सरपंचांना पीपीई किट देणार असल्याचेही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग