शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

CoronaVirus Lockdown : बदलापुरातून आलेल्यांची तपासणी केली काय? : नीतेश राणे आढावा बैठकीत संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:28 IST

जनतेच्या आरोग्यापेक्षा आम्हाला दुसरे काहीही महत्त्वाचे वाटत नाही. त्यामुळे कोणाचेही फोन आले तर तुम्ही वितळून जाऊ नका. कोणाचीही चूक अजिबात चालणार नाही. बदलापूर हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. तेथून आचिर्णेत लोक आले आहेत. त्यांची तुम्ही तपासणी केलीत काय? असा संतप्त सवाल आमदार नीतेश राणे यांनी तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना आढावा बैठकीत केला.

ठळक मुद्देबदलापुरातून आलेल्यांची तपासणी केली काय? : नीतेश राणे आढावा बैठकीत संतप्त कोणाचीही चूक चालणार नाही; प्रशासनाला इशारा

वैभववाडी : जनतेच्या आरोग्यापेक्षा आम्हाला दुसरे काहीही महत्त्वाचे वाटत नाही. त्यामुळे कोणाचेही फोन आले तर तुम्ही वितळून जाऊ नका. कोणाचीही चूक अजिबात चालणार नाही. बदलापूर हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. तेथून आचिर्णेत लोक आले आहेत. त्यांची तुम्ही तपासणी केलीत काय? असा संतप्त सवाल आमदार नीतेश राणे यांनी तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना आढावा बैठकीत केला.आमदार राणे यांनी तहसील कार्यालयात ह्यकोरोनाह्णच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी तहसीलदार रामदास झळके, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज कांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ नवनाथ कांबळे, पुरवठा अधिकारी संभाजी खाडे, शिवराज चव्हाण उपस्थित होते.

कोरोनामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या बदलापुरातून काही लोक आचिर्णे येथे आले आहेत. तसेच होम क्वारंटाईन व्यक्तीला शिवभोजन योजनेचा ठेका दिला गेला होता. अशा प्रकारांतून कोरोनाचा प्रसार झाला तर तालुक्याचे काय होईल? याचा विचार करा. राजकीय नेते आणि सामान्य जनता असा फरक करु नका, असे खडे बोल आमदार राणे यांनी तहसीलदार झळके यांना सुनावले.आरोग्य विभागाचा आढावा घेताना होम क्वारंटाईनमध्ये खूपच हलगर्जीपणा दिसून येत आहे. या संकटाला इतकेही सहज घेऊ नका. लोकांच्या आयुष्यापेक्षा आम्हाला काहीच महत्त्वाचं वाटत नाही. त्यामुळे चुका करु नका, असा इशारा राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.आमदार राणे यांनी धान्य पुरवण्याची माहिती घेतली. त्यावेळी शिधापत्रिका नसलेल्या लोकांना धान्य देण्याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना काढलेली असताना त्यांना धान्य का देत नाही? त्या लोकांनी काय करायचे? अशी विचारणा केली. त्यावर वरिष्ठ कार्यालयाकडून जादा पुरवठा झालेला नाही. मात्र, अशा लोकांची माहिती संकलित करुन जिल्ह्याला पाठविण्यात आली आहे असे झळके व पुरवठा अधिकारी खाडे यांनी स्पष्ट केले....तर सक्षम पर्याय निर्माण कराआठवडा बाजाराच्या निमित्ताने आजूबाजूच्या गावातून लोक येतात. ते भाजीपाला व अन्य वस्तू घेऊन जातात. बुधवारचा आठवडा बाजार बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असाल; तर बाजारात येणाºया शहराबाहेरच्या लोकांना सक्षम पर्याय निर्माण करुन द्या, अशी सूचना आमदार नीतेश राणे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना केल्या.अन्य रुग्णांसाठी खासगी सहकार्य घ्याशासकीय आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या मोहिमेत आहे. त्यामुळे अन्य आजारांच्या रुग्णांबाबत काय नियोजन आहे. याबाबत माहिती घेत. अन्य रुग्णांना तपासणी व उपचारांसाठी खासगी 'डॉक्टर्स'चे सहकार्य घ्या. जे डॉक्टर्स सहकार्य करण्यास तयार असतील 'त्या' डॉक्टर्सची यादी रुग्णांच्या माहितीसाठी जाहीर करा, अशी सूचना नीतेश राणे यांनी आरोग्य विभागाला केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे