CoronaVirus : सिंधूदुर्गात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये वाढ, पुन्हा सापडले तब्बल ३ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 06:48 PM2020-06-08T18:48:53+5:302020-06-08T18:58:05+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, आता पुन्हा तब्बल ३ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले. दिवसभरात ९ रुग्ण आढळले असून त्यामुळे सिंधुदुर्गात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या १३० वर पोहोचली आहे.  यात मालवण (१) व सावंतवाडीतील (२) व्यक्तींचा समावेश आहे.

CoronaVirus: Increase in corona positive patients in Sindhudurg, 3 patients found again | CoronaVirus : सिंधूदुर्गात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये वाढ, पुन्हा सापडले तब्बल ३ रूग्ण

CoronaVirus : सिंधूदुर्गात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये वाढ, पुन्हा सापडले तब्बल ३ रूग्ण

Next
ठळक मुद्दे सिंधूदुर्गात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये वाढ,  पुन्हा सापडले तब्बल ३ रूग्णकोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या पोहोचली १३० वर

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, आता पुन्हा तब्बल ३ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले. दिवसभरात ९ रुग्ण आढळले असून त्यामुळे सिंधुदुर्गात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या १३० वर पोहोचली आहे.  यात मालवण (१) व सावंतवाडीतील (२) व्यक्तींचा समावेश आहे.

सिंधुदुर्गातही आता रुग्णसंख्या १३० वर पोहोचली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळी आढळलेल्या प्राप्त अहवालामध्ये ९  व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये (मळेवाड, ता. सावंतवाडी) येथील १, तळगाव, मालवण येथील १, आसोली, वेंगुर्ला १, कणकवली तालुक्यातील तळेरे येथील १ व घोणसरी येथील २  व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनानं आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

आता सापडलेल्या रुग्णांमध्ये मालवण तालुक्यात १ रूग्ण व सावंतवाडी तालुक्यात 2 असे एकूण ३ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत.जिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेल्या ४१ कोरोना तपासणी अहवालांपैकी ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून ३८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉजिटीव्ह अहवालांची संख्या १३० झाली आहे.

Web Title: CoronaVirus: Increase in corona positive patients in Sindhudurg, 3 patients found again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.