शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

coronavirus: एकीकडे रुग्ण दगावताहेत तर दुसरीकडे व्हेंटिलेटर धूळ खाताहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 15:46 IST

संपूर्ण राज्यात व्हेंटिलेटरचा प्रश्न कोरोनाच्या काळात प्रामुख्याने गाजला मात्र शासन सर्व परस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटरचा पुरवठा करत आहे.

- अनंत जाधव सावंतवाडी - कोरोनाचा प्रसार सर्वत्र झपाटयाने होत आहे.अनेक रुग्ण  व्हेंटिलेंटर अभावी मृत्यूमुखी पडत आहेत.शासन सर्व स्तरावरून माणसाचा मृत्यू होउ  नये म्हणून जास्ती जास्त व्हेंटिलेटरचा पुरवठा रूग्णालयाना केला जात आहे.मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात उलटी परस्थिती आहे.पुरवठा केलेले तब्बल दहा व्हेंटिलेटर तब्बल तीन महिने धुळखात पडले असून,ते वापराविना आहेत. याबाबत कुटीर रूग्णालय प्रशासनाशी संर्पक केला असता ते व्हेंटिलेटर जोडले असल्याचे सांगतात पण प्रत्यक्षात ते धुळखात पडल्याचे दिसून येत आहे. माणस व्हेंटिलेटर अभावी मरतात मग ते धुळखात कशासाठी असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.संपूर्ण राज्यात व्हेंटिलेटरचा प्रश्न कोरोनाच्या काळात प्रामुख्याने गाजला मात्र शासन सर्व परस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटरचा पुरवठा करत आहे. तसेच जिल्हास्तरावर ही कोव्हिड १९ च्या माध्यमातून नियोजन विभागाने व्हेंटिलेटर खरेदीसाठी कोटयावधी रूपयांचा निधी आरोग्य विभागाकडे वर्ग केला होता.त्यातूनच सावंतवाडी कुटीर रूग्णालयासाठी तब्बल दहा व्हेंटिलेटर तातडीने देण्यात आले हे व्हेंटिलेटर तीन महिन्यापूर्वीच सावंतवाडी कुटीर रूग्णालयात येउन पडले आहेत. मात्र अद्याप पर्यत बसविण्यात आले नाही.सध्या आमच्या कडे हदय रोग तज्ञ नसल्याचे उत्तर वैद्यकीय अधिकारी देत आहेत.मात्र पंधरा दिवसा पासून हदयरोग तज्ज्ञ ओरोस येथे गेले आहेत.मग तत्पूर्वी व्हेंटिलेटर का बसवण्यात आले यांचे मात्र उत्तर आरोग्य प्रशासनाकडे नाही.कोरोनाचा प्रादूभार्व सध्या जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यातच मागील चार दिवसात जिल्हा रूग्णालयात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला ते दोघेही राजकीय पक्षाचे नेते मात्र ते व्हेंटिलेटर अभावी मृत पावले त्याना जर   वेळेत व्हेंटिलेटर मिळाला असता तर ते जीवंत ही राहिले असते जिल्हा रूग्णालयांची परस्थीती ही गंभीर आहे.काहि गंभीर रूग्ण सावंतवाडीत ही ठेवता आले असते. पण सावंतवाडी रूग्णालय प्रशासनाकडे वैद्यकीय अधिकारी ही नाहीत आणि कर्मचारीही वर्ग नसल्याची सबब देत यावर पाणी फिरवले जात आहे.त्यामुळे हे व्हेंटिलेटर सध्या धुळखात पडले आहे.विशेष म्हणजे काहि राजकीय पक्षांनी याबाबत रूग्णालय प्रशासनाला जाब विचारल्यानंतर आता हे व्हेंटिलेटर एक इमारतीत ज्या इमारतीत कोणीही रूग्ण जात नाही अशा ठिकाणी लावून ठेवण्यात आले आहेत.मात्र त्या व्हेंटिलेटरचा वापर करण्यासाठी न लावता हे व्हेंटिलेटर शोभेचे बाहुलेच ठरत आहेत.

पालकमंत्र्याचे लक्ष वेधणार - रूपेश राउळसावंतवाडी कुटीर रूग्णालयात व्हेंटिलेटर दिले आहेत.ते व्हेंटिलेटर वापरले जावेत तसेच पुन्हा सावंतवाडीत हदयरोग तज्ञ अभिजीत चितारी यांना आणले जावे यासाठी आम्ही पालकमंत्री उदय सामंत यांना विनंती करणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राउळ यांनी सांगितले. व्हेंटिलेटर दिले आहेत.ते जोडले - वैद्यकीय अधीक्षकसावंतवाडी कुटीर रूग्णालयाला व्हेंटिलेटर दिले आहेत.ते व्हेंटिलेटर लावण्यात आले आहेत.मात्र हदयरोग तज्ञ नाही असे मत वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांनी सांगितले मात्र व्हेंटिलेटर आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी