शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

corona virus : यावर्षी मुंबईकरांचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर मुंबईतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 18:33 IST

चाकरमान्यांना आम्ही केलेले आवाहन पटले असून, मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये येण्याचे टाळले आहे, असे मत खासदार विनायक राऊत यांनी मांडले.

ठळक मुद्देयावर्षी मुंबईकरांचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर मुंबईतचचाकरमान्यांनी जिल्ह्यात येणे टाळले : विनायक राऊत

सावंतवाडी : शिवसेना नेहमी समाजकारण करीत आली आहे. हे समाजकारणाचे व्रत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आम्हांला मिळाले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून अशाप्रकारे लोकांप्रती आपलेपणा बाळगला जातो. याचे हे जिवंत उदाहरण आहे. चाकरमान्यांना आम्ही केलेले आवाहन पटले असून, मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये येण्याचे टाळले आहे, असे मत खासदार विनायक राऊत यांनी मांडले.शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या पुढाकारातून तालुक्यातील निराधार व दारिद्र्यरेषेखालील तब्बल दोनशे कुटुंबांची वीज बिले शिवसेनेच्यावतीने अदा करण्यात आली आहेत. ही बिले भरण्यात आली येऊन त्यांच्या पावत्यांचे वाटप खासदार राऊत यांच्या हस्ते ग्राहकांना करण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, विक्रांत सावंंत, विकास कुडाळकर, रूची राऊत, भरत पंडित, महिला तालुकाप्रमुख रश्मी माळवदे, अपर्णा कोठावळे, सचिन वालावलकर, शब्बीर मणियार, महेश शिरोडकर, अशोक दळवी, विनोद काजरेकर, सुनील गावडे, अनिल जाधव, योगेश नाईक, संजय माजगावकर आदी उपस्थित होते.शैलेश परब म्हणाले, शिवसेना संघटना कायम गोरगरिबांच्या मदतीला धावत असते. शिवसेनाप्रमुखांनी ती शिकवण दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारिद्र्यरेषेखालील दोनशे ग्राहकांची वीज बिले परस्पर जमा केली आहेत. लोक आर्थिक संकटात आहेत. कोरोना युद्धात शत्रू समोर दिसत नसला तरी लोक विवंचनेत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही वीज बिले भरली आहेत. शिवसेनाप्रमुखांची ८० टक्के समाजकारण ही शिकवण आहे.विक्रांत सावंत व संजय पडते यांनी शैलेश परब व रुपेश राऊळ यांच्या टीमचे कौतुक केले. गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर लोक आर्थिक विवंचनेत असताना शिवसेनाप्रमुखांच्या ८० टक्के समाजकारणाचा संदेश घेऊन हे काम केले आहे, असे मी मानतो. वीजबिले भरून एक चांगला संदेश देण्यात आला आहे, असे ते म्हणाले. यावेळी दोनशे ग्राहकांना बिल भरलेल्याची पावती खासदार राऊत यांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले तर आभार अनिल जाधव यांनी मानले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईsindhudurgसिंधुदुर्ग