शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

corona virus : आत्महत्याग्रस्ताचे स्वॅब का घेतले?, आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 14:58 IST

कोळपे येथील आत्महत्याग्रस्त व्यक्तीचे रात्री उशिरा स्मशानभूमीत जाऊन स्वॅब घेतले. या प्रकारामुळे गावातील लोकांमध्ये कोरोनाबद्दल भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने स्वॅब घेणाऱ्या डॉ. सचिन बर्गे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिला आहे.

ठळक मुद्देआत्महत्याग्रस्ताचे स्वॅब का घेतले?, आंदोलनाचा इशारा त्या डॉक्टरची चौकशी करावी, नासीर काझी यांचा इशारा

वैभववाडी : कोळपे येथील आत्महत्याग्रस्त व्यक्तीचे रात्री उशिरा स्मशानभूमीत जाऊन स्वॅब घेतले. या प्रकारामुळे गावातील लोकांमध्ये कोरोनाबद्दल भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने स्वॅब घेणाऱ्या डॉ. सचिन बर्गे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिला आहे.जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनात काझी यांनी म्हटले आहे की, २९ आॅगस्टला कोळपे बौद्धवाडी येथील महादेव सखाराम कांबळे यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे आणला. परंतु तेथील डॉक्टर सचिन बर्गे यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यानंतर डॉ. उमेश पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.मृताचे नातेवाईक मुंबईवरून येणार असल्यामुळे अंत्यविधी करण्यास वेळ लागला. दरम्यान, त्याच रात्री दीड वाजता डॉ. बर्गे यांनी स्मशानभूमीत जाऊन मृताचे स्वॅब घेतले. या सर्व प्रकारामुळे कोळपे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्वॅब त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून घेतला.

स्वॅब घेण्यापूर्वी त्यांनी वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत या सर्व प्रकाराची चौकशी करून डॉ. बर्गेंवर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काझी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिला आहे.कोळपे हा गाव कंटेन्मेंट झोन आहे. लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने वरिष्ठांच्या सल्ल्याने व पूर्वपरवानगीने त्या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला. त्यात माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढून मला नाहक त्रास देण्यात येत आहे. ज्यादिवशी हा प्रकार झाला त्या दिवशी माझी ड्युटी नव्हती; तरीसुद्धा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी माझ्याकडून कटरचे काम करून घेतले.

वेगवेगळ्या पद्धतीने मला त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. यासंदर्भात मी त्यांच्याविरोधात २४ आॅगस्टला पोलिसांत तक्रार अर्ज दिलेला आहे, असे ग्रामीण रुग्णालयाचे बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बर्गे यांनी स्पष्ट केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाटील हे आपल्यावर पाळत ठेवणे, त्रास होईल असे कृत्य करणे असे प्रकार वारवांर करीत असल्याचा तक्रार अर्ज डॉ. बर्गे यांनी पोलिसांत दिला आहे.वरिष्ठांना अहवाल दिला आहे : डॉ. पाटीलडॉ. सचिन बर्गे हे ग्रामीण रुग्णालयात काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा माझा संबंधच येत नाही. परंतु कोळपे प्रकरणात ते चुकीचे वागले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांच्या समक्ष माफी मागितली आहे. स्वॅब घेण्याच्या काही पद्धती प्रशासनाने निश्चित केलेल्या आहेत. त्या पद्धतीनुसारच काम करावे लागते. डॉ. बर्गे यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आरोग्य विभाग बदनाम झाला आहे. याबाबतच वरिष्ठांना अहवाल देण्यात आलेला आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटलBJPभाजपाSuicideआत्महत्या