शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: सिंधुदुर्गात ट्रुनॅट मशिनद्वारे कोरोना तपासणी कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 17:22 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशिनद्वारे स्वॅब तपासणीची इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली (आयसीएमआर) कडून परवानगी देण्यात आली आहे.

कणकवली- जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशिनद्वारे कोरोनाची तपासणी सुरू झाली आहे. आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, रेण्विय निदान प्रयोगशाळेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उल्हास लोखंडे, डॉ. पी.एम. मोरे व तंत्रज्ञ परब यांच्या उपस्थितीत यंत्र सामुग्रीची पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशिनद्वारे स्वॅब तपासणीची इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली (आयसीएमआर) कडून परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या ट्रुनॅट एक मशीन व सिबी नॅट कोरोना एक, अशा दोन तपासणी मशीन उपलब्ध आहेत.या दोन्ही मशिनद्वारे एका तासात दोन तपासणी होऊ शकतात. ट्रुनॅट मशीनद्वारे स्वॅब तपासल्यानंतर याची स्क्रीनिंग टेस्ट होऊन निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह स्वॅब रिपोर्ट मिळतो. जर निगेटिव्ह रिपोर्ट असेल तर तो कन्फर्म रिपोर्ट असतो तर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर हा रिपोर्ट कन्फर्म करण्यासाठी  सीबीनॅट मशिन किंवा आरटीपीसीआर मशीनमध्ये तपासणीसाठी पाठवणे आवश्यक असते. या दोन्ही मशिनद्वारे स्वॅब टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यासाठीचे प्रशिक्षण एन. आय. बी. पुणे यांचेकडून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.याचवेळी जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत माकड तापाचे (के.एफ.डी.) निदान करणारी प्रयोगशाळाही कार्यान्वित झालेली आहे. यापूर्वी माकड ताप नमुने तपासणीसाठी एन.आय.बी.पुणे किंवा मनीपाल रुग्णालय, गोवा यांच्याकडे पाठविण्यात येत होते. आता ही लॅब कार्यान्वित झाल्यामुळे हे नमुने स्थानिक पातळीवर तपासता येणार आहेत. तसेच या लॅबमध्ये लॅप्टोस्पारोसिस, डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांची तपासणी करता येणार आहे. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण एन.आय.बी.पुणे कडून झाले आहे. तसेच लागणारे इतर मशिन्स लवकरच प्राप्त होणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस