शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

corona cases in Sindhudurg : कणकवलीत डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याने सतर्कता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 18:25 IST

corona cases in Sindhudurg : कणकवली शहरातील परबवाडी येथे एका कॉम्प्लेक्समध्ये राहणारी व्यक्ती तपासणीअंती डेल्टा प्लस कोविड रुग्ण असल्याचे समोर आले आहे. मात्र, सध्या तो सक्रिय रुग्ण नसून उपचाराअंती तो बरा देखील झाला आहे. मात्र, नगरपंचायतीने त्या अनुषंगाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे.

ठळक मुद्देकणकवलीत डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याने सतर्कतानगरपंचायत, आरोग्य विभाग अलर्ट

कणकवली : शहरातील परबवाडी येथे एका कॉम्प्लेक्समध्ये राहणारी व्यक्ती तपासणीअंती डेल्टा प्लस कोविड रुग्ण असल्याचे समोर आले आहे. मात्र, सध्या तो सक्रिय रुग्ण नसून उपचाराअंती तो बरा देखील झाला आहे. मात्र, नगरपंचायतीने त्या अनुषंगाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे.

संबंधित कॉम्प्लेक्समधील सुमारे १४० पेक्षा जास्त लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्याचे काम सुरू करण्यात आले असून, या भागात कंटेन्मेंट झोनदेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोविड संदर्भातील नियमांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.शहरात डेल्टा प्लसचा जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर नलावडे, तहसीलदार आर. जे. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, गटनेते संजय कामतेकर, डॉ. संतोष चौगुले, डॉ. सतीश टाक, आरोग्य सेविका भाट, माजी नगरसेवक बंडू गांगण, नगरपंचायत कर्मचारी सतीश कांबळे, प्रवीण गायकवाड, ध्वजा उचले व आरोग्य विभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांनी त्या कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी भेट दिली.५० मीटर अंतरात कंटेन्मेंट झोन करणारनगराध्यक्ष नलावडे, तहसीलदार पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ यांनी आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या स्वॅब कलेक्शनच्या कामाची माहिती घेतली. त्या कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी स्वॅब कलेक्शनसाठी बुधवारी व गुरुवारी दोन दिवस आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असणार आहे. या कॉम्प्लेक्समधील सर्व लोकांचे स्वॅब तपासणी करण्यात येणार असून, या भागात पन्नास मीटरच्या अंतरात कंटेन्मेंट झोनदेखील करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष नलावडे यांनी दिली.तहसीलदारांकडून आढावातहसीलदार आर. जे. पवार यांनी याठिकाणी उपस्थित राहत आढावा देखील घेतला. डॉ. संजय पोळ यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. डेल्टा प्लसचा कोविड रुग्ण जरी सापडला असला तरी तो रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरा झाला आहे. मात्र, नागरिकांनी नियमित मास्क वापरणे व कोविड संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारीडॉ. पोळ यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग