शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

माती उत्खनन, विक्री प्रकरणी ठेकेदार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 17:16 IST

बांदा-सटमटवाडी येथे आरटीओ विभागाच्या सीमा तपासणी नाक्याच्या क्षेत्रात बेकायदेशीर माती उत्खनन व विक्री केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनी चांगलीच अडचणीत आली आहे. त्या क्षेत्रात विनापरवाना बेसुमार माती उत्खनन करून तिची परस्पर विक्री करण्यात आली होती. याविरोधात शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांनी सावंतवाडी तहसीलदारांकडे तक्रार केली होती.

ठळक मुद्देबांदा सटमटवाडीतील सीमा तपासणी नाका कंपनीला ३ अब्ज ४९ कोटी २५ लाखांचा दंड

बांदा : बांदा-सटमटवाडी येथे आरटीओ विभागाच्या सीमा तपासणी नाक्याच्या क्षेत्रात बेकायदेशीर माती उत्खनन व विक्री केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनी चांगलीच अडचणीत आली आहे. त्या क्षेत्रात विनापरवाना बेसुमार माती उत्खनन करून तिची परस्पर विक्री करण्यात आली होती. याविरोधात शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांनी सावंतवाडी तहसीलदारांकडे तक्रार केली होती.याप्रकरणी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ठेकेदार कंपनीला ३ अब्ज ४९ कोटी २५ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तशाप्रकारची नोटीस सोमवारी संबंधिताला बजावण्यात आली असून १५ दिवसांत ही रक्कम भरण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानिमित्ताने बाधीत शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांच्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.आरटीओ विभागाच्या सीमा तपासणी नाक्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना संबंधित ठेकेदार कंपनीने ह्यहम करे सो कायदाह्ण या उक्तीप्रमाणे बेकायदेशीर कामांचा सपाटाच लावला होता. सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून नाक्याचे काम रेटण्यात आले होते. त्या कंपनीने सर्व्हे नंबर १८९ (क), क्षेत्र ११.९५.५ हेक्टर-आर जमिनीत २ लाख १२ हजार ९६२ ब्रास मातीचे विनापरवाना उत्खनन करून तिची परस्पर विक्रीही केली.शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठे यशसावंतवाडी तहसीलदार म्हात्रे यांनी त्या ठेकेदार कंपनीला तब्बल ३ अब्ज ४९ कोटी २५ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंडाच्या रकमेत वाहतूक दंड आकारण्यात आलेला नाही. त्या दंडाची रक्कम १५ दिवसांत भरण्याचे निर्देशही तहसीलदारांनी दिले आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे काम करणाºया कंपनीला मोठा हादरा बसला आहे. तर शेतकऱ्यांच्या कंपनी विरोधातील यशाला मोठे यश प्राप्त झाले आहे.

टॅग्स :sandवाळूsindhudurgसिंधुदुर्ग