शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; भुईबावडा घाटात दरडी रस्त्यावर, मालवणसह अनेक शहरे जलमय 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 20, 2023 18:25 IST

घरांमध्ये, बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून मागील तीन दिवसात साडेतीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. संततधार पावसाने उसंत घेतली नसल्याने नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. सखल भागात पाणी साचले असून काही शहरातील घरांमध्ये, बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. भुईबावडा घाटात छोट्या मोठ्या दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत.मुसळधार पावसामुळे अनेक गावातील जुनी मातीची घरे कोसळली आहेत. तर काही ठिकाणी घरांवर आजूबाजूची झाडे पडूनही नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसात सुमारे २० घरांचे आणि ८ ते १० गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

भातशेती पाण्याखाली

नद्यांना पुरपरिस्थिती मुळे पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्यात पाऊस कोसळत असल्याने पाणी वाढून ते नदीलगतच्या भातशेतीत घुसत आहे. काही नदीकाठची भातशेती गेले दोन दिवस पाण्याखाली आहे. पुरसद्श स्थिती निर्माण झाल्याने आताच लावणी केली भातरोपे पाण्याखाली गेली आहेत. आणखी दोन दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकरी बांधवांवर संकटाची टांगती तलवार, तसेव घरांचे नुकसान कायम राहणार आहे.

घरांवर झाडे कोसळून नुकसानमालवण शहर परिसरात गुरूवारी मुसळधार पावसाने कहरच केला. यामुळे रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील देऊळवाडा येथे नागू वळकर हे मोलमजुरी करून राहत असलेल्या कुटुंबाच्या झोपडी वजा घरावर झाड कोसळले.यात घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. सुकळवाड येथे लवू चिंदरकर यांच्या घराचे पडझडीमुळे नुकसान झाले. याबाबत मालवण महसूल प्रशासनाकडे नोंद करण्यात आली आहे.

मालवण शहर जलमयमालवण शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. बसस्थानकासमोरील मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दुकाने व घरातही पाणी शिरले. मुसळधार पावसाने मालवण शहरात जलमयस्थिती झाली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसlandslidesभूस्खलन