शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दलाली बंद झाल्याने ग्राहकांना दिलासा; कणकवली गावठी आठवडा बाजाराची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 15:46 IST

सिंधुदुर्गात पहिला कणकवलीत गावठी आठवडा बाजार सुरू करण्यात आला. या गावठी आठवडा बाजारात शेतकरी स्वत:चा माल विकतात़.त्यांना कोणालाही दलाली न देता पैसे मिळतात त्याचा मला खरच आनंद वाटतो. ग्राहकांनाही कमी दरामध्ये चांगल्या वस्तू मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसे येणे हे प्रगतीचे लक्षण असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी काढले.

ठळक मुद्देदलाली बंद झाल्याने ग्राहकांना दिलासा; कणकवली गावठी आठवडा बाजार वर्षपूर्ती शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसे हे प्रगतीचे लक्षण : नारायण राणे

कणकवली : सिंधुदुर्गात पहिला कणकवलीत गावठी आठवडा बाजार सुरू करण्यात आला. या गावठी आठवडा बाजारात शेतकरी स्वत:चा माल विकतात़.त्यांना कोणालाही दलाली न देता पैसे मिळतात त्याचा मला खरच आनंद वाटतो. ग्राहकांनाही कमी दरामध्ये चांगल्या वस्तू मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसे येणे हे प्रगतीचे लक्षण असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी काढले.कणकवली येथील गावठी आठवडा बाजार वर्षपूर्ती व बाजार शेड लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, जि़ल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सभापती सुजाता हळदिवे, जि़ल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, स्नेहसिंधुचे हेमंत सावंत, संदीप राणे, पंकज दळी, डॉ. प्रसाद देवधर, विजय शेट्टी, डॉ़. मिलींद कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते़.हा कार्यक्रम कणकवली पंचायत समिती , स्रेहसिंधु पदविधर संघ व जिल्हा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात  नारायण राणे पुढे म्हणाले, दलालीमुळे ५ रूपयांची वस्तू ५० रूपयांना विकली जाते़.गावठी आठवडा बाजारात खऱ्या अर्थाने दलाली बाजूला राहिली आहे. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व या आठवडा बाजारासाठी ज्यांनी-ज्यांनी मेहनत घेतली त्यांना मी धन्यवाद देतो़.

शेतकऱ्यांच्या यशासाठी खऱ्या अर्थाने आवश्यक असलेले काम तुम्ही सर्वांनी केले आहे. सतीश सावंत यांना भेट दिलेल्या वडाच्या आयुष्याप्रमाणे १०० वर्षे आयुष्य लाभो. या गावठी आठवडा बाजारासाठी खासदार फंडातून १० लाख रूपयांचा निधी मी जाहीर करतो.  मुंबईत गावठी आठवडा बाजारासाठी लागणारी मदत आम्ही सर्वतोपरी करणार आहोत, असेही ते म्हणाले.आमदार नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रातील पहिला गावठी आठवडा बाजार कणकवली पंचायत समितीने चांगले नियोजन करून राबविला. त्याचे खरे श्रेय माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम व त्यांच्या सहकाऱ्यांना जात आहे़. स्वत: शुक्रवारच्या बाजारात उभे राहून भाग्यलक्ष्मी साटम हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी काम करत होत्या. शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम आमच्या पंचायत समितीने केले आहे़. नेहमी कणकवलीचे नाव आले की 'राडा ' असे संबोधले जायचे, परंतू त्या नावाची ओळख महाराष्ट्रात आठवडा बाजाराच्या निमित्ताने पंचायत समितीने केली आहे.सतीश सावंत म्हणाले, गावठी आठवडा बाजारात उपलब्ध होणाऱ्या वस्तू ह्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत. गावठी कोंबडी, अंडी, रानभाज्या यासारख्या गोष्टी येथे उपलब्ध होतात. भविष्यात गावठी आठवडा बाजार विक्रेत्यांची संस्था स्थापन करून थेट शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना राबविण्यात येईल.डॉ़.प्रसाद देवधर, रणजित देसाई, विजय शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, वैदेही परब, रोहीणी बागवे, प्रिया परब, मनिषा सावंत, सुनिता ठाकूर, गीता आचरेकर या महिलांचा सत्कार करण्यात आला़ लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या शेडचे लोकार्पण नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रकाराला दशावतार म्हणायचा काय?कणकवलीत दहशतवाद असल्याचा नेहमीच विरोधक उल्लेख करतात़. मग सायंकाळी सात वाजल्यानंतर या गावठी आठवडा बाजाराच्या कार्यक्रमात महिला व लहान मुले आली आहेत़. मग एवढी माणसे कशी जमतात ? तर दुसरीकडे वेंगुर्लेत नगरसेविकेच्या घरात घुसून मारहाण केली जाते, त्याला काय दशावतार म्हणायचा काय? अशा तीव्र शब्दात भाजपा पदाधिकाऱ्यांनी वेंगुर्लेत केलेल्या मारहाणीवर नारायण राणेंनी यावेळी टिकास्त्र सोडले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग