शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीला पोहोचलेच नाहीत, कणकवलीतच अडकले बांधकाममंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 00:35 IST

मुंबई गोवा मार्गावरचे खड्डे पाहणीसाठी शुक्रवारी सकाळी निघालेली बांधकाममंत्र्याची गाडी मध्यरात्री बारा वाजेपर्यत कणकवलीतच थांबली होती.

ठळक मुद्देसावंतवाडीतील मेजवाणीवर अधिकाऱ्यांनीच मारला ताव

सावंतवाडी : मुंबई गोवा मार्गावरचे खड्डे पाहणीसाठी शुक्रवारी सकाळी निघालेली बांधकाममंत्र्याची गाडी मध्यरात्री बारा वाजेपर्यत कणकवलीतच थांबली होती. अखेर त्यानी सावंतवाडीत येणे टाळत ओरोस येथील विश्रामगृहातच मुक्काम ठोकला. त्यामुळे लाखो रूपये खर्च करून विश्रामगृहांवर लखलखाट आणि आयोजित केलेल्या मेजवानीवर अधिकाऱ्यांनाच ताव मारावा लागला. आता, बांधकाममंत्री भल्या पहाटे रस्त्याची पाहणी करणार अशी चर्चा आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळत नाही.                                         

शुक्रवारी सकाळी राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे पनवेल येथून खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी निघाले होते. पाटील हे रात्री 8 वाजेपर्यंत सावंतवाडीत पोहचणार होते. त्यासाठी बांधकाम विभागाचे सर्वच अधिकारी कामाला लागले होते. पर्णकुटी विश्रामगृहावर मंत्री महोदय येणार असल्याने विश्रामगृहांची सजावट आणि विद्युष रोषणाईही केली होती. बांधकाम मंत्र्याबरोबर तब्बल शंभर ते दिडशे अधिकारी व कार्यकर्ते असतील, म्हणून मेजवानीचीही तजवीज करण्यात आली होती. अधिकारी वर्ग रात्री बारा वाजेपर्यत विश्रामगृहावर वाट बघत होते. मात्र रात्री 10 वाजता अधिकाऱ्यांना मंत्री महोदय कणकवलीतूनच कोल्हापूरला जाणार असा निरोप आल्याने अधिकारी वर्गाने सुटकेचा निश्वास टाकला. तर, मंत्रीमहोदयासाठी आयोजित केलेल्या मेजवाणीवर अधिकाऱ्यांनी ताव मारला. मात्र, काही वेळातच मंत्री महोदय आता ओरोसमध्येच राहणार असा निरोप आल्याने अधिकारी वर्गाची चांगली धांदल उडाली. 

खड्डे पाहणीसाठी सकाळी पनवेलहून निघालेले बांधकाममंत्री कणकवलीलाच अडकले. त्यामुळे त्याना सिंधुदुर्गातील खड्डेच पाहता आले नाहीत. बांधकाम विभागाच्या अख्यारित येणाऱ्या रस्त्यात त्याच खात्याचे मंत्री अडकल्याने अधिकाऱ्यांनीही खड्डे भरण्याच्या नावाखाली मंत्र्याच्याच डोळ्यात धुळफेक केल्याचे दिसत आहे. तसेच मंत्र्याच्या या दौऱ्यावर लाखो रूपये खर्च झाल्यामुळे बांधकाम मंत्र्यांनी निदान ओरोस मुक्कामी थांबून सकाळी तरी सावंतवाडी पर्यतचे खड्डे पाहावेत. निदान गणेश चतुर्थीपर्यत खड्डे बुजण्यास मदत होईल, अन्यथा खड्डे भरण्याच्या नावावरही दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो रूपये खर्च होतील हे विशेष.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSawantvadi Police Stationसावंतवाड़ी पोलिस स्टेशन