शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस'च्यावतीने कणकवलीत उद्या मशाल रॅलीचे आयोजन

By सुधीर राणे | Updated: June 11, 2025 15:44 IST

'निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना भाजप नेते का उत्तर देत आहेत?'

कणकवली : बोगस मतांच्या पाठबळावर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी आवाज उठविला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने कणकवलीत उद्या, गुरुवारी (दि.१२) सायंकाळी ६.३० वाजता मशाल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे.कणकवली येथील काँग्रेसच्या तालुका संपर्क कार्यालयात आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूणकर, तालुका उपाध्यक्ष संजय राणे, आयेशा सय्यद, जिल्हा सचिव विजय सावंत, प्रदीपकुमार जाधव, नीलेश मालंडकर, डॉ.प्रमोद घाडीगावकर, बाबा काझी आदी उपस्थित होते.शेख म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मतदानामध्ये शेवटच्या टप्प्यात लाखोंनी मते वाढली आहेत. तर लोकसभा व विधानसभेच्या मतदानात मोठी तफावत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु निवडणूक आयोगाने त्याबाबत अद्यापही माहिती दिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही नेत्यांनी  याला उत्तर देताना मात्र अनेक मुद्यांना बगल दिली आहे. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना भाजप नेते का उत्तर देत आहेत? निवडणूक आयोगाने त्यांना प्रवक्ते नेमले आहे का? याचे उत्तर आधी भाजपने जनतेला द्यावे.याबाबत जनजागृती होण्यासाठी कणकवली शहरातून उद्या, गुरुवारी मशाल रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडे सहा वाजता बसस्थानकालगतच्या बौद्धविहार येथून या रॅलीला सुरूवात होईल. तेथून अप्पासाहेब पटवर्धन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही रॅली निघणार आहे. संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन शेख यांनी केले.