कुडाळ नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

By Admin | Updated: April 19, 2016 00:36 IST2016-04-18T23:31:55+5:302016-04-19T00:36:10+5:30

भाजप-सेनेला भोवली सत्तेची लालसा : काँग्रेसला ९, शिवसेना ६, भाजप १, अपक्ष १

Congress flag on Kudal Nagar Panchayat | कुडाळ नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

कुडाळ नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

कुडाळ : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवत कॉंगे्रसने निर्विवाद वर्चस्व मिळविले. शिवसेनेला सहा, भाजपसह अपक्षाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला. मतदारांनी काँग्रेस नेते,माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखविला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि काँगे्रस-राष्ट्रवादीची आघाडी समोरासमोर उभी ठाकली होती. तर अपक्षांच्या सहभागानेही निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती. सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. चार फेरीत ही मतमोजणी होती. अवघ्या एका तासातच निकाल जाहीर झाला. पहिल्या कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवत सत्ता प्रस्थापित केली. शिवसेनेला सहा जागा मिळाल्या. तर सत्तेची स्वप्ने रंगवत राज्यात दबदबा निर्माण करणाऱ्या भाजपला मतदारांनी सपशेल नाकारले. केवळ एकाच जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आला. तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली. (प्रतिनिधी)

Web Title: Congress flag on Kudal Nagar Panchayat