शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
2
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
3
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
4
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
5
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
6
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
7
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
8
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
9
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
10
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
11
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
12
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
13
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
14
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्
15
प्रज्वल रेवन्ना भारतात येणार, बंगळुरूसाठी फ्लाइट तिकीट बुक!
16
"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग
17
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
18
थरार: गाढ झोपलेल्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
19
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
20
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर

अखेर कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रिन करोल विजयी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 1:56 PM

या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे संख्याबळ असले तरी भाजपने नगराध्यक्ष निवडणुकीत चमत्कार घडेल, असा दावा केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

कुडाळ : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या उमेदवार आफ्रिन करोल यांनी भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांचा ९ विरुद्ध ८ मतांनी पराभव केला आहे.कुडाळ नगरपंचायतच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आठ जागांवर तर शिवसेनेने सात जागांवर यश मिळवले होते. तर काँग्रेसने या नगरपंचायतीच्या दोन जागांवर यश मिळविल्या. नंतर काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची मागणी केली होती. त्यानुसार नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या आफ्रिन करोल यांनी तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. 

या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे संख्याबळ असले तरी भाजपने नगराध्यक्ष निवडणुकीत चमत्कार घडेल, असा दावा केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत काँग्रेसच्या आफ्रिन करोल यांनी ९ विरुद्ध ८ मतांनी विजय मिळवल्याने कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.निवडणुकी दरम्यान सकाळी शिवसेना-भाजपामध्ये मोठा राडा झाला. आमदार वैभव नाईक यांची गाडी रोखल्याने भाजपा- शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुकी देखील झाली. यामुळे येथील वातावरण तणावपुर्ण बनले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळcongressकाँग्रेस