शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीबाबत संभ्रम; तांत्रिक अडचण असल्याचे प्रशासनाचे म्हणणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 07:26 IST

ओसरगाव, राजापूर, हातिवले टोल नाके आज सुरू होणार?

सिंधुदुर्ग : मुंबई- गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, हातिवले येथील टोल नाके अखेर बुधवारपासून (१ जून) सुरू करण्यात येणार आहेत. या बाबतची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. ओसरगावसोबत राजापूर- हातिवलेमधील टोलही आजपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनधारकांसह दोन्ही जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.सिंधुदुर्गात अनेक राजकीय पक्षांनी या टोल नाक्याला विरोध केला होता. एवढ्यात टोल सुरू करू नका, असे अनेकांनी म्हटले होते. टोल सुरू केला तर आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला होता.

रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश काम बाकीमुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील हातिवले टोल नाका परिसरातील काम वगळता इतर बहुतांश काम अपुरे आहे. त्यामुळे तूर्तास टोल सुरू करू नये, यावरून राजकारणही तापले आहे. टोल नाका सुरू होत असल्याने वाहन चालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.

भाजपने दिला टोल नाका फोडण्याचा इशारादरम्यान, भाजपचे कणकवलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेत, टोलमधून एमएच ०७ म्हणजे सिंधुदुर्ग पासिंगमधील सर्व गाड्यांना संपूर्ण टोलमाफी द्यावी, ही मागणी पूर्ण न केल्यास टोल नाका फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टोल सुरू कराल तर शिवसेनेशी गाठ : वैभव नाईकमुंबई- गोवा महामार्गासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. सिंधुदुर्गवासीयांना टोल माफी झालेली नाही, लोकांच्या मागण्यादेखील प्रलंबित आहेत. असे असतानादेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जूनपासून टोल सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. याला नागरिकांचा विरोध असून, जर १ जूनपासून टोल सुरू कराल, तर शिवसेनेशी गाठ आहे, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाsindhudurgसिंधुदुर्ग