शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

संगणक परिचालकांचे वेंगुर्ल्यात धरणे, कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 1:07 PM

आपले सरकार केंद्रात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात परिचालक म्हणून कायमस्वरुपी सामावून घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व संगणक परिचालकांनी पंचायत समिती वेंगुर्ला येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देसंगणक परिचालकांचे धरणे, वेंगुर्ल्यात आंदोलन कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी

वेंगुर्ला : आपले सरकार केंद्रात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात परिचालक म्हणून कायमस्वरुपी सामावून घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व संगणक परिचालकांनी पंचायत समिती वेंगुर्ला येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.गेल्या आठ वर्षांपासून आपले सरकार सेवा केंद्रामध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे कित्येक महिने मानधन मिळत नाही. शासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी संगणक परिचालकांनी राज्यातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती संगणक परिचालक यांना महाराष्ट्र आयटी मंडळात सामावून घेऊन सर्व संगणक परिचालकांना यामध्ये कायमस्वरुपी नियुक्ती देणे, सर्व संगणक परिचालकांना राज्याच्या निधीतून किमान मासिक वेतन १५ हजार रुपये देणे, सर्व संगणक परिचालकांचे जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत वेतन मानधन देणे या मागण्यांसाठी सर्व संगणक परिचालक धरणे आंदोलन करीत आहेत.या आंदोलनाला वेंगुर्ला पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, गटविकास अधिकारी उमा पाटील, विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गणेश  बागायतकर,  उपाध्यक्ष अनिल चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी तसेच तालुका समन्वयक गणेश अंधारी यांनी भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.या धरणे आंदोलनात मयुरेश अंकुश मांजरेकर (ग्रामपंचायत आडेली), सुधाकर अनंत धोंड (ग्रामपंचायत वायंगणी-खानोली), रघुनाथ अनंत जुवाटकर (ग्रामपंचायत म्हापण), सुनीता रामदास आरोलकर (ग्रामपंचायत उभादांडा), अस्मिता अमित नाईक (ग्रामपंचायत होडावडा), वामन रघुवीर मडकईकर (ग्रामपंचायत केळुस), शांताराम नामदेव मुळीक (ग्रामपंचायत आसोली), योगिता सुरेश परब (ग्रामपंचायत शिरोडा), पूर्वा लक्ष्मण कांदे (ग्रामपंचायत वजराठ), रुपाली भिवा गावडे (ग्रामपंचायत मठ), दीप्ती उदय धुरी (ग्रामपंचायत वेतोरे), सुप्रिया सुधाकर ठुंबरे (ग्रामपंचायत तुळस), आरती सदाशिव पडते (ग्रामपंचायत मेढा), प्रियांका रंगनाथ केळुसकर (ग्रामपंचायत परबवाडा), पूजा हनुमंत वराडकर (ग्रामपंचायत मातोंड-पेंडूर) या परिचालकांनी सहभाग घेतला.वेंगुर्ला येथे एक दिवसाच्या धरणे आंदोलनात संगणक परिचालक सहभागी झाले होते.

टॅग्स :Vengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग