शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पती, सासूविरुद्ध भावाची पोलिसांत तक्रार : कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:58 IST

कुसूर मधलीवाडी येथील भक्ती भरत पाटील ही नवविवाहित भाजल्याप्रकरणी तिचा भाऊ सूरज सत्यवान तळेकर याने पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. याप्रकरणी बहिणीचा पती व सासूवर भक्तीच्या भावाने संशय व्यक्त केला आहे. गेल्या बुधवारी  १० एप्रिलला

ठळक मुद्देकुसूर येथील नवविवाहिता भाजल्यामुळे गंभीर 

वैभववाडी : कुसूर मधलीवाडी येथील भक्ती भरत पाटील ही नवविवाहित भाजल्याप्रकरणी तिचा भाऊ सूरज सत्यवान तळेकर याने पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. याप्रकरणी बहिणीचा पती व सासूवर भक्तीच्या भावाने संशय व्यक्त केला आहे. गेल्या बुधवारी  १० एप्रिलला सकाळी गंभीररित्या भाजलेल्या भक्तीवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

भक्तीचा भाऊ सूरज याने शुक्रवारी वैभववाडी पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. त्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, ‘भक्ती भरत पाटील (पूर्वाश्रमीची सायली सत्यवान तळेकर, कुसूर-पिंपळवाडी) हिचा गावातीलच भरत वसंत पाटील याच्याशी २०१४ मध्ये विवाह झाला. भरत हा सध्या गावातीलच माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहे. लग्न झाल्यापासून पती आणि सासू सतत भक्तीचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत होते. दरम्यानच्या काळात त्यांना दोन मुले झाली. त्यामुळे आता तरी तिचा छळ कमी होईल, अशी आम्हांला अपेक्षा होती.

परंतु, भक्तीचा पती आणि सासूच्या वर्तनात काहीच बदल झाला नाही. उलट त्यांच्याकडून त्रास देणे सुरुच राहिले. त्यामुळे १ एप्रिल रोजी भक्ती पुन्हा माहेरी आली होती. सतत होणाºया त्रासामुळे आम्ही तिला माहेरीच राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ती ८ एप्रिलपर्यंत माहेरी आमच्याकडेच होती. तिचा पती भरत हा गावातील काही प्रतिष्ठीत लोकांना घेऊन ८ एप्रिलला आमच्या घरी आला. त्यावेळी सोबत आलेल्या प्रतिष्ठित लोकांनी समजावल्यामुळे भरत आणि त्याच्या आईच्या वर्तनात सुधारणा होईल, आणि सुखाचा संसार करतील या भाबड्या आशेवर आम्ही पुन्हा तिला सासरी पाठविले होते.

त्यानंतर तिची खुशाली विचारण्यासाठी गेल्या बुधवारी १० रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास फोन केला असता पहाटे ५.३० च्या सुमारास जेवण करीत असताना भक्ती भाजली असल्याचे तिच्या पतीने मला  सांगितले. पती आणि सासूच्या त्रासामुळेच हा सर्व प्रकार घडला असावा, असा संशय भक्तीचा भाऊ सूरज याने तक्रार अर्जात व्यक्त केला. पती आणि सासू या दोघांनी तिचा सतत छळ केला आहे. त्यामुळे या दोघांनीच तिचे बरेवाईट करण्याचा प्रयत्न केला असावा, असा संंशय तक्रार अर्जात व्यक्त करीत या प्रकरणाची चौकशी करून आपल्या बहिणीला व आम्हांला न्याय द्यावा, अशी मागणीही सूरजने पोलिसांकडे केली आहे.जबाबानंतर पुढील कार्यवाही : बाकारेकुसूर येथील भक्ती भरत पाटील या नवविवाहितेचा भाऊ सूरज तळेकर याने आपल्याकडे शुक्रवार १२ रोजी अर्ज दिला आहे. दरम्यान, भक्ती जिल्हा रुग्णालयात असताना सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी तिचा जबाब घेतला आहे. सध्या तिच्यावर कोल्हापुरात उपचार सुरु आहेत. तिच्या भावाच्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने येत्या एक दोन दिवसांत कोल्हापुरात जाऊन भक्तीचे जबाब घेतले जातील. त्यानंतर तिच्या जबाबानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी