शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 20:01 IST

ZpElecation Sindhudurng Shivsena- कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे, त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी केले. ते मळगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

ठळक मुद्देआगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम : विनायक राऊत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर भगवा फडकवा, भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीने काम करा.

कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे, त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी केले. ते मळगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.यावेळी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, महिला प्रमुख जान्हवी सावंत, राज्य माथाडी जनरल कामगार संघटना सरचिटणीस प्रशांत कोठावळे, दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा परिषद सदस्या संपदा देसाइ, धनश्री गवस, श्रेयाली गवस, विनिता घाडी, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, महिला तालुका संघटक अपर्णा कोठावळे, रश्मी माळवदे, अ‍ॅड. नीता सावंत-कविटकर, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब आदी उपस्थित होते.ही निवडणूक म्हणजे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम असल्याने सर्वांनी जबाबदारीने काम करून सर्व ग्रामपंचायती सेनेकडे आणण्यासाठी कामाला लागा, असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, एकनाथ नारोजी, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, अर्चना पांगम, नारायण राणे, तालुका संघटक संजय गवस, दौलत राणे, गोपाळ गवस, संदीप कोरगावकर, लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, मिलिंद नाईक, संतोष मोरये, भिवा गवस, राजू शेटकर, योगेश नाईक उपस्थित होते.ग्रामपंचायत पातळीवर निवडणूक एकसंघशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे गावाचा विकास करत असताना या निवडणुकीवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. मागील पाच वर्षात पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे व आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गतिमान विकास साधत असून, आपले राज्य हा प्रचार जनमानसात करा असे खासदार राऊत म्हणाले. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्याने ग्रामपंचायत पातळीवर निवडणुका एकसंघ लढविण्यास खासदार विनायक राऊत यांनी अनुमती दिली. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाZP Electionजिल्हा परिषद