सामूहिक वनाधिकार हक्क कायदा सिंधुदुर्गात हवा- माधव गाडगीळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 03:05 PM2019-07-28T15:05:57+5:302019-07-28T15:06:19+5:30

आघाडी सरकारच्या काळात सामुहिक वनअधिकारी हक्क कायदा अमलात आला आहे.

The Collective Forest Rights Act should be in Sindhudurg | सामूहिक वनाधिकार हक्क कायदा सिंधुदुर्गात हवा- माधव गाडगीळ

सामूहिक वनाधिकार हक्क कायदा सिंधुदुर्गात हवा- माधव गाडगीळ

Next

अनंत जाधव
सावंतवाडी : आघाडी सरकारच्या काळात सामुहिक वनअधिकारी हक्क कायदा अमलात आला आहे. या कायद्याची गडचिरोली जिल्हयात प्रभावी अमलबजावणी झाली आहे.तेथे वनक्षेत्र ही मोठे आहे.त्याप्रमाणात सिंधुदुर्गमध्ये ही वनक्षेत्र मोठे असून येथेही सामूहिक वनअधिकार कायदा अमलात आणला गेला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला आपल्या वनसंपत्तीचे जतन करणे सोपे जाईल, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यानी लोकमतशी बोलतना मांडले.

कशाप्रकारे सामुहिक वनअधिकार हक्क कायदा आहे
सामुहिक वनअधिकार हक्क कायदा हा २००६ मध्ये अमलता आला आहे. या कायद्यामुळे आपणास आपल्या वनसंपत्तीचे जतन करणे सोपे जाते.सामुहिक पध्दतीने त्यावर आपण त्या जमिनीची जोपसना तसेच त्यावरून कोणते ही प्रकल्प उभारू शकतो.
गडचिरोलीमध्ये या कायद्यांतर्गत कसे काम सुरू आहे
गडचिरोली मध्ये जवळपास २०१० पासून वनअधिकार हक्क कायद्याचे काम सुरू झाले तेथील लोकांनी एकत्र येउन प्रचार प्रसार करून काम सुरू केले आहे.मला त्यानी फक्त निमंत्रित केले त्यानंतर आता पर्यत त्याना लागणारी मी मदत करत आहे.
सिंधुदुर्गमध्ये ही वनक्षेत्र मोठे आहे
गडचिरोली प्रमाणे सिंधुदुर्ग मध्ये ही वनक्षेत्र मोठे आहे.येथे ही अशा प्रकारे काम होउ शकते.लोकांना याबद्दल माहीती झाली पाहिजे गडचिरोली जसे काम सुरू आहे.तसे काम आम्ही सिंधुदुर्ग मध्ये ही करू शकतो लोकांना मदत ही केली जाईल 
आपल्या जमिनीचे अधिकार आपणास राहातील
सामूहिक वनअधिकार हक्क कायद्याची सुरूवात २००६ मध्ये झाली आहे.यातून आपल्या जमिनीचे अधिकार आपणास राहाणार आहेत.फक्त त्याची योग्य अमलबजाव णी होणे गरजेचे आहे.लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे तरच हा प्रयोग यशस्वी होउ शकतो.
सिंधुदुर्ग वासियांनी बोलवले तर नक्की येईन
मला वन व पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग मधील लोक जर एकत्र येउन यांची अमलबजावणी करीत असतील तर मला सिंधुदुर्ग मध्ये काम करण्यास नक्की आवडेल असे मत पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यकत केले.

Web Title: The Collective Forest Rights Act should be in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.