मुख्यमंत्र्यांचा दौरा लांबणीवर?

By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-03T21:50:30+5:302015-11-04T00:08:27+5:30

जगबुडी नदीपात्र : डोह विकसित करण्याच्या आशा पल्लवीत

CM's postponed stay? | मुख्यमंत्र्यांचा दौरा लांबणीवर?

मुख्यमंत्र्यांचा दौरा लांबणीवर?

खेड : जलयुक्त शिवाराच्या माध्यतातून खेड तालुक्यातील जगबुडी नदीवर डोह जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.महाळुंगे गावातील जगबुडी नदीच्या उगमस्थानापासून खेड शहराकडे वाहात असलेल्या नदीपात्रातील पाण्याचा डोह जलयुक्त शिवार योजना आणि लोकसहभागातून विकसित करण्यात येणार आहे. ‘व्हिलेज पर्यटन’ बनवण्याची शासनाची अभिनव योजना आहे. या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डिसेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. मात्र, हा दौरा मुख्यमंत्र्यांच्या नियोजित परदेश दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रद्द होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. यामुळे आगामी काही दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची शक्यता आहे.
कुलूमनालीसारखे निसर्गसौंदर्य कोकणात आहे. यामुळे साहजिकच अनेक पर्यटकांना येथील निसर्ग भुरळ घालतो. एकूणच पर्यटकांना कोकणच्या ग्रामीण भागातील जीवनमान आणि राहणीमान याबाबत नेहमीच कुतूहल आहे. येथील वातावरणात पर्यटक हरवून जातात. त्यांना येथील मनोरंजनपर कार्यक्रमांचेही अप्रूप वाटते. त्यामुळे पर्यटनाद्वारे येथील आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. याच धर्तीवर जगबुडी नदीचा प्रवाह अडवून तेथे डोह बांधण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. बंधाऱ्याच्या माध्यमातून अडवल्या जाण्याऱ्या पाण्याचा उपयोग आधुनिक शेती आणि भाजीपाल्यासह दुग्ध व्यवसायासाठी करण्यात येणार आहे. लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावपातळीवर कमिट्या स्थापन करून पर्यटनाला वाव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी यादवराव यांनी हातलोट घाटातून वाहतुकीला प्रारंभ केल्यानंतर महाबळेश्वरजवळ येणारे परदेशी पर्यटक कोकणात येण्यास राजी होतील, यामुळे कोकणचे निसर्गसौंदर्य जगाच्या नकाशावर येणार आहे. (प्रतिनिधी)


व्हिलेज पर्यटन : शासनाचा उपक्रम
कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी, त्याचबरोबर येथील निसर्गसंपदेतून आर्थिक विकासाला चालना देण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठी ‘व्हिलेज पर्यटन’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

'परदेश दौरा
डिसेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पण, परदेश दौऱ्यामुळे ते अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Web Title: CM's postponed stay?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.