४३२ ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी स्वच्छता
By Admin | Updated: October 29, 2015 00:08 IST2015-10-28T23:48:08+5:302015-10-29T00:08:11+5:30
जिल्हा परिषदेचा उपक्रम : महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रीय स्वच्छता अभियान

४३२ ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी स्वच्छता
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व ४३२ ग्रामपंचायत क्षेत्रात एकाचवेळी स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली परिसर स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छता अभियान २०१५ अन्वये या स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात एकाचवेळी करण्यात आले होते. या उपक्रमात सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकांत रणदिवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील काळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन देशमुख या सर्व खातेप्रमुखांसह जिल्हा परिषदमधील सर्व अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते.
हा कार्यक्रम जिल्हा परिषदअंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असून यावर्षीसुद्धा यशस्वीपणे स्वच्छतेचा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान अनेक ग्रामपंचायतीमध्ये प्रभातफेरी, पथनाट्य, समूहगान, प्रचारफेरी काढण्यात आल्या व स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी हा उपक्रम राबविण्यात आला असून तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे : सावंतवाडी पंचायत समिती कार्यालय व ७४ ग्रामपंचायती क्षेत्रात परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. दोडामार्ग पंचायत समिती कार्यालय व एकूण ३६ ग्रामपंचायती क्षेत्रात परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. मालवण पंचायत समिती कार्यालय व ६९ ग्रामपंचायती क्षेत्रात परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. देवगड पंचायत समिती कार्यालय व ७४ ग्रामपंचायती क्षेत्रात परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. वैभववाडी पंचायत समिती कार्यालय व ३४ ग्रामपंचायती क्षेत्रात परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. वेंगुर्ला पंचायत समिती कार्यक्षेत्रातील सर्व ३० ग्रामपंचायती क्षेत्रात परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्याची पहिलीच वेळ आहे. (प्रतिनिधी)