शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रॅक्टर भरून प्लास्टिक गोळा, विद्यार्थ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:34 IST

प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने कणकवली येथील विद्यामंदिर प्रशालेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे दोन ट्रॅक्टर म्हणजे जवळपास ७० ते ८० किलो एवढे प्लास्टिक गोळा करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही सहभाग घेतला.

ठळक मुद्देदोन ट्रॅक्टर भरून प्लास्टिक गोळाकणकवली येथील विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम

कणकवली : प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने कणकवली येथील विद्यामंदिर प्रशालेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे दोन ट्रॅक्टर म्हणजे जवळपास ७० ते ८० किलो एवढे प्लास्टिक गोळा करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही सहभाग घेतला.२ आॅक्टोबरपासून संपूर्ण देशभरात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरात होत असलेल्या प्लास्टिकच्या महापुरापासून, प्रदूषणापासून देशाला सोडविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या कार्यक्रमात सहभाग म्हणून कणकवली विद्यामंदिरने हा उपक्रम राबविला. तसेच प्रशालेतील सेवायोजनेच्या तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातील पहिला टप्पा म्हणून आपले घर व घराच्या आसपासच्या परिसरातील प्लास्टिक गोळा करून परिसर स्वच्छ केला.यावेळी महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, पुणे या विभागांतर्गत पर्यावरण सेवा योजना या विभागाच्या राज्य समन्वयक सुप्रिया निशाणदार यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकची उत्पत्ती व त्याचे वाढते प्रमाण याविषयी चित्रफितीद्वारे माहिती दिली. तसेच देशाला प्लास्टिकमुक्त करण्याकरिता आपला हातभार लावावा. त्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.या उपक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक बी. डी. सरवदे, पर्यवेक्षक पी. जे. कांबळे, वनपाल किशोर जंगले, वनरक्षक रुपाली पाटील, स्वच्छता को-आॅर्डिनेटर हर्षदा सावंत, मनोज धुमाळे, अमोल शेळके, सुनिता वारघडे, विद्या शिरसाट, अच्युत वणवे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांचे योजनाप्रमुख राणे यांनी अभिनंदन केले. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीStudentविद्यार्थीsindhudurgसिंधुदुर्ग