शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षण अभियान : वेंगुर्ले नगरपरिषद देशात अठरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 14:54 IST

राज्य व केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पाचगणी नगरपरिषदेने पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तर पहिल्या वीस नगरपालिकांमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने देशात अठरावा क्रमांक मिळवित आपले स्थान कायम ठेवले आहे.

वेंगुर्ले : राज्य व केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पाचगणी नगरपरिषदेने पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तर पहिल्या वीस नगरपालिकांमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने देशात अठरावा क्रमांक मिळवित आपले स्थान कायम ठेवले आहे. कणकवली नगरपंचायतीने ३६ वा, सावंतवाडी नगरपालिकेने ६४ वा तर मालवण नगरपरिषदेने ७८ वा क्रमांक पटकावला आहे. याबाबतची घोषणा शनिवारी जाहीर झाली असून केंद्र सरकारने देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे झोन तयार केले होते.यात मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दमण-दिव या राज्यांचा समावेश होता. त्यातून हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला आहे.२०१७-१८ मध्ये भारत सरकारच्या स्वच्छता विभागाने देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू केले होते. हे स्वच्छ सर्वेक्षण अभियान वेगवेगळ््या नगरपालिका क्षेत्रात घेण्यात आले होते. यात देशातून १४२२ नगरपालिकांनी सहभाग घेतला होता. यातून देशातील पहिल्या वीस नगरपालिकांना खास बक्षीस देण्यात येणार आहे. या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्र सरकारचे प्रतिनिधी येऊन करीत असत. तर विभागीय स्तरावरून मार्गदर्शन केले जात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी व मालवण या नगरपालिकांनी सहभाग घेतला होता.स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेगवेगळे मुद्दे देण्यात आले होते. यात प्रशासकीय कामकाज, लोकांची मते, स्वच्छतेबाबतची जागरूकता आदी मुद्दे यात घेण्यात आले होते. त्यांना गुण देण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात येऊन नागरिकांशी थेट चर्चा केली. हे प्रतिनिधी नगरपालिका क्षेत्रात दोन दिवस थांबले होते. त्यांनी कचºयाचे व्यवस्थापन तसेच पालिका राबवित असलेले प्रकल्प आदींची पाहणी केली होती व त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता.केंद्र सरकारच्या विविध प्रतिनिधींकडून आलेल्या अहवालांनंतर त्यांचे गुणांकन करून हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. सर्व क्रमांक केंद्र सरकारने वेबसाईटवर टाकले आहेत. यात देशात स्वच्छतेत महाराष्ट्र सरकारचा दुसरा क्रमांक आला आहे. तर स्वच्छतेत देशात महाराष्ट्रातून पाचगणी ही नगरपालिका पहिली आली आहे.दरम्यान, सन २०१५ ते २०१८ या कालावधीत वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छ शहर पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार २०१७ व २०१६, फाईव्ह लिव्हज् राष्ट्रीय सन्मान २०१८, कोकण विभागात प्रथम, महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट नगरपालिका, हागणदारीमुक्त शहर पुरस्कार असे पुरस्कार मिळविले आहेत. हे सर्व यश नागरिक, स्वच्छता कर्मचारी व दूत, आजी-माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सहकार्याने मिळाले असल्याचे मुख्याधिकारी वैभव साबळे व नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.तर सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केले असून, वेंगुर्ले व कणकवली नगरपालिका नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचे खास अभिनंदन केले आहे.केंद्र सरकारकडून खास गौरवपहिल्या वीस नगरपालिकांमध्ये येण्याचा मान वेंगुर्ले नगरपालिकेने पटकावला असून या नगरपालिकेचा केंद्र सरकारच्यावतीने खास गौरव करण्यात येणार आहे. तर कणकवली नगरपंचायतीने ३६ वा, सावंतवाडी नगरपालिकेने ६४ वा  तर मालवण नगरपालिकेने ७८ वा क्रमांक पटकावला आहे. हे क्रमांक १४२२ नगरपालिकेतून निवडण्यात आले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग