शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Sindhudurg: कडेकोट पोलीस बंदोबस्त असूनही राजकोट किल्ल्यावर 'राडा'; अधीक्षक म्हणाले..

By अनंत खं.जाधव | Updated: August 28, 2024 18:58 IST

लाठीचार्ज केला असता पण..

मालवण: सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने घटनेची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर गेले होते. यादरम्यान भाजपाचे खासदार नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील आपल्या समर्थकांसह किल्ल्यावर पोहोचले. यावेळी राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा झाला. यावर सिंधुदुर्गपोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली.परिसरात जो राडा झाला त्याबद्दल पोलिस निश्चित कारवाई करणार असून व्हिडिओ फूटेज तसेच फोटो बघून नंतर कारवाई करण्यात येणार आहे. वेळेत थोडसे पुढे-मागे झाल्यानेच दोन्ही पक्षाचे नेते एकाच वेळी किल्ला परिसरात आले त्यामुळेच हा प्रसंग घडला. पण पोलिसांनी परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळली असल्याचे सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. लाठीचार्ज केला असता पण आम्ही दोघांना समजावणे महत्वाचे मानले असे ही ते म्हणाले.किल्ला परिसरात झालेल्या जोरदार राड्यामुळे याठिकाणचे वातावरण काही तणावपुर्ण बनले होते. मोठी घटना घडण्यापुर्वीच पोलिसांनी योग्य पध्दतीने ही परिस्थिती हाताळली. यामुळे वेळीच परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिस अधीक्षक म्हणाले, दोन्ही गटाचे समर्थक समोरासमोर आले तर काही तरी घडेल म्हणून आम्ही वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पण दोघांनाही दिलेल्या वेळात थोडा पुढे मागे झाले आणि उध्दवसेनेचे पदाधिकारी व भाजपचे पदाधिकारी एकाच वेळी किल्ला परिसरात आले आणि त्यानंतर थोडासा राडा झाला. मात्र, पोलिसांनी योग्य पध्दतीने परिस्थिती हाताळली त्यामुळे आम्ही लाठीचार्ज केला नाही. अद्याप याबाबत तक्रारी दाखल झाल्या नाहीत. मात्र, आम्ही व्हिडिओ तसेच फोटो बघून गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAditya Thackreyआदित्य ठाकरेNarayan Raneनारायण राणे Policeपोलिस